शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

के. के. रेंजमधील ‘त्या’ २३ गावांचे काय होणार? ग्रामस्थात पुन्हा खळबळ....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2020 20:43 IST

राहुरी, नगर व पारनेर तालुक्यातील २३ गावांमध्ये के. के रेंज अधिग्रहण होणार असल्याची चर्चा  पुन्हा सुरू झाली आहे. अधिग्रहण होणार नसल्याचे आश्‍वासन राजकीय नेत्यांकडून अनेक वर्षांपासून दिले जात आहे. परंतु मागील दोन महिन्यांपूर्वी सैन्य दलाकडून संबंधित क्षेत्राचे  मूल्याकंन घेतल्यानंतर गावांमध्ये पुन्हा पाहणी सुरू  झाली आहे.

राहुरी : राहुरी, नगर व पारनेर तालुक्यातील २३ गावांमध्ये के. के रेंज अधिग्रहण होणार असल्याची चर्चा  पुन्हा सुरू झाली आहे. अधिग्रहण होणार नसल्याचे आश्‍वासन राजकीय नेत्यांकडून अनेक वर्षांपासून दिले जात आहे. परंतु मागील दोन महिन्यांपूर्वी सैन्य दलाकडून संबंधित क्षेत्राचे  मूल्याकंन घेतल्यानंतर गावांमध्ये पुन्हा पाहणी सुरू  झाली आहे.

जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व आमदार निलेश लंके यांच्या माध्यमातून के. के. रेंजचा प्रश्‍न संपुष्टात आणण्याचे आश्‍वासन दिले आहे. यामुळे २३ गावातील ग्रामस्थांनी काळजी न करण्याचे आवाहन गाडे यांनी केले आहे.

        जिल्ह्यामध्ये १९५६ पासून सुमारे ४० हजार हेक्टर क्षेत्रावर सैन्य दलाकडून के.के. रेंज क्षेत्रावर सराव करीत आहे. १९८० पासून के.के. रेंज आर-२ मध्ये राहुरी, नगर व पारनेर या तीन तालुक्यातील २३ गावांमधील २५ हजार ६१९ हेक्टर क्षेत्र अधिग्रहीत करण्यात आलेली आहे. सदरचे क्षेत्र हे सुरक्षा क्षेत्र म्हणून जाहिर झाल्यानंतर २००५ मध्ये रेड झोन असा शिक्कामोर्तब करण्यात आला. 

    राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही जिल्हाधिकारी कार्यालयात के.के. रेंज बाबत बैठक घेत अधिग्रहण होऊ देणार नसल्याचे स्पष्ट केले होते. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे आश्‍वासन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिले आहे.

 दरम्यान सैन्य दलाच्या अधिका-यांंनी केलेल्या  पाहणीमुळे २३ गावांमध्ये अधिग्रहणाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे. भारतीय सैन्य दलाकडून अधिग्रहण होणार नसेल तर मालमत्तेची माहिती, मूल्याकंन तसेच पाहणी कशासाठी केली जात आहे? असा प्रश्‍न  ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.    राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थितीत नगरपालिकेच्या सभागृहांमध्ये बारागाव नांदूरचे सरपंच यांची बैठक झाली. बैठकीमध्ये के. के. रेंजसंदर्भात विचार विनिमय करण्यात आला.   सैन्य दलाच्या अधिकाºयांनी केलेल्या पाहणी संदर्भात आम्हाला अधिक माहिती मिळू शकली नाही, असे राहुरीचे तहसीलदार एफ.आर. शेख यांंनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी