संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथे प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विद्यालयाचा ३३ वा वर्धापण दिनानिमित्त पत्रकारांचा गौरव करण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना ब्रम्हकुमारी अनिता बहन बोलत होत्या. यावेळी ब्रम्हकुमार रामनाथ आरोटे यांनी विद्यालयाचा संक्षिप्त परिचय करुन देताना पत्रकार दिनाचे महत्त्व समजावले. याप्रसंगी तीळगूळ वाटप करुन उपस्थित पत्रकाराचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सरुनाथ उंबरकर, ब्रह्मकुमार विष्णुभाई उंबरकर उपसरपंच नानासाहेब उंबरकर, ग्रामपंचायत सदंस्य विजय शेळके, सुरेश थोरात, रामनाथ जऱ्हाड, संजय गायकवाड, योगेश रातडीया, रवींद्र बालोटे, अनिल शेळके, संकेत कचेरीया, अमोल राखपसरे, सचिन उपाध्ये, अनिल बर्डे, रमेश भालेराव, गोकूळ भवर, काशीनाथ उंबरकर, संजय उंबरकर, गोपीनाथ भुसाळ, लालजी माळी, संजय मैड, विलास गाडेकर आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व सूत्रसंचालन ब्रह्मकुमार विष्णुभाई उंबरकर यांनी केले. तर आभार रामभाई भागवत यानी मानले.
२२ अनिता बहन