शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

अहमदनगरमध्ये जेलभरो आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 15:07 IST

या निषेधार्थ अहमदनगरमध्ये जेलभरो आंदोलन करण्यात आले.

अहमदनगर : बहुजन क्रांती मोर्चा देशातील एससी, एसटी, एनटी, ओबीसी (कुणबी सह) आणि यातुन धर्म परिवर्तीत अल्पसंख्याक समाजाला संविधानीक मार्गाने आपल्या हक्क व अधिकारांविषयी जागृत होण्यासाठी राष्ट्रीय परिवर्तन यात्रेचे आयोजन केले असून या यात्रेचा अहमदाबाद समारोप होणार होता. मात्र गुजरात पोलिसांनी अचानक परवानगी नाकारत राष्ट्रीय परिवर्तन यात्रेचे अध्यक्ष वामन मेश्राम यांना अटक केली. या निषेधार्थ अहमदनगरमध्ये जेलभरो आंदोलन करण्यात आले.वामन मेश्राम साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय परिवर्तन यात्रेचे २४ राज्य ४५० जिल्ह्यांमध्ये ही यात्रा गेली होती. बहुजन समाजामधे एकजूट व बंधुभाव निर्माण करून, त्यांच्यावर शासन व प्रशासना द्वारे होणा-या अन्याय व अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी व त्यांचे संविधानिक मौलिक अधिकार सुरक्षित ठेवण्यासाठी, तसेच देशातील लोकशाहीला, संविधानाला आणि जनतेच्या मूलभूत अधिकाराला मारक ठरणा-या मतदान यंत्राला विरोध करण्यासाठी शांततापूर्ण आणि संविधानिक मागार्ने लढाई लढण्याचे काम परिवर्तन यात्रे द्वारे केले जात आहे. परिवर्तन यात्रा गुजरात राज्यात १८ सप्टेंबर २०१८ पासून निरंतर सुरु आहे. या परिवर्तन यात्रेचा समारोपाचा कार्यक्रम आज २२ आॅक्टोबर २०१८ ला अहमदाबाद येथे होत आहे. परंतु गुजरात मधील भाजप सरकारने पोलीस प्रशासनवर दबाव आणून ऐनवेळी कार्यक्रमाची परवानगी रद्द करून, संविधानाच्या कलम १९ चे उल्लघन केले आहे. तसेच संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. वामन मेश्राम यांना गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. आणि निषेध नोंदविणा-या संघटनेच्या कार्यकर्त्यांंवर लाठी चार्ज करणा-या पोलिसांचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. सदर निषेध नोंदवण्यासाठी संपूर्ण देशातील ५५० जिल्ह्यातील ४००० तालुका स्तरावर जेलभरो आंदोलन केले. त्याअंतर्गत अहमदनगर येथे पोलीस ठाण्यात जेलभरो आंदोलन करण्यात आले. यावेळी भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.आंदोलनात बहुजन मुक्ती पाटीर्चे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब मिसाळ, बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक राजेंद्र करंदीकर, बहुजन मुक्ती पार्टीचे जिल्हाध्यक्ष अविनाश देशमुख, बेरोजगार मोर्चाचे सारंग घोडेस्वार, भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नामदेव राळेभात, मेजर धनराज साळवे, संजय संसारे, संतोष वाघमारे, डॉ. रमेश गायकवाड, गफ्फारभाई शेख, आरपीआय तालुकाध्यक्ष अमित जाधव, तालुका बलुतेदार संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब शिरतार , राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे अध्यक्ष शब्बीर शेख, दिगंबर भोसले, शरद नगरे, दगडु बर्डे,राकेश कर्डक, सुधाकर भोसले, राकेश बारसे, राहुल शिंदे, अमित हरिहर, कानिफ आंबेडकर, सुरेश गायकवाड, सागर सोनवणे, सुभाष गायकवाड, अतुल भालेराव, सुधीर सोनवणे, आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस