अहमदनगर : विधान परिषदेच्या अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातील निवडणुकीत अपक्ष उमेदवार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांची दिल्लीवारी बुधवारी सायंकाळपर्यंत वेटींगवर होती. बुधवारी उशिरा रात्री प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण दिल्लीत पोहोचणार होते. त्यानंतर होणाऱ्या बैठकीत स्पष्ट निर्णय होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. दरम्यान, आघाडीचे उमेदवार अरुण जगताप यांनी लोणीत घेतलेल्या पाहुणचाराच्या चर्चेने राजकीय वर्तुळात रंग भरले आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या हालचाली पुन्हा एकदा संथ झाल्या आहेत. आघाडीचे उमेदवार आ.अरुण जगताप यांच्या विरोधात जयंत ससाणे रिंगणात उतरल्याने राजकीय समीकरणे बदलली आहेत. मात्र, या सामन्यासाठी ससाणे यांना पक्षाकडून हिरवा कंदील अपेक्षित आहे. यासाठी त्यांनी मंगळवारी दिल्ली गाठली होती. पक्ष प्रभारी मोहन प्रकाश यांच्याशी सविस्तर चर्चा करुन मतदानाचे गणित त्यांच्यासमोर मांडण्यात आल्याचे म्हटले जाते. मोहन प्रकाश हे गणित पाहून उत्साहित होते, याचीही चर्चा ससाणे समर्थकात होती. जिल्ह्यातील काँग्रेसचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मात्र सावध भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. दोन्ही नेत्यांनी प्रदेश किंवा केंद्राच्या नेत्यांकडून जो आदेश येईल, त्यांची अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे, असे समजते. त्यामुळे ससाणे समर्थक काहीसे माघारले होते. विखे-थोरात यांची ताकद पाठीशी नसेल तर निवडणुकीला सामोरे जाणे अवघड होऊन बसेल, असा तर्क यासाठी मांडला जात आहे. मात्र प्रदेशच्या नेत्यांना मुंबईतील राष्ट्रवादीचे प्रसाद लाड यांच्या बंडखोरीचे कोलीत हाती लागले आहे. त्याचा पक्षाच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो. एका चर्चेप्रमाणे मोहन प्रकाश ससाणेंना ताकद द्यावी, या मानसिकतेत आहेत. मात्र, यासाठी त्यांना प्रदेशाध्यक्ष
जयंत ससाणेंची दिल्लीवारी वेटींगवर!
By admin | Updated: December 16, 2015 23:10 IST