यावेळी कारखान्याचे अध्यक्ष एम. एन. नवले, व्यवस्थापनक व्ही. बी. निंबाळकर, मुख्य अभियंता एस. ए. साखरे, केमिस्ट एन. जी. चौधरी, मुख्य लेखाधिकारी एस. ए. शिंदे, मुख्य शेती अधिकारी एम. एम. मोहिते यांच्यासह विभागप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी निंबे म्हणाले की, शासनाचा परवाना मिळाला की ॲाक्टोबरपासून यंदाचा गाळप हंगाम सुरू होऊन तीन लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट आहे. हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने कारखाना अंतर्गत साफसफाई, दुरुस्तीचे कामे अंतिम टप्प्यात आहेत. मागील हंगामात कारखान्याने २ लाख ४१ हजार १११ मेट्रिक टन गाळप केले होते. कारखान्याने तोडणी वाहतुकीसाठी १२५ ट्रॅक्टरच्या टोळ्या कायम केल्या असून त्यांना पहिल्या हप्त्याचे वाटप केले आहे. कारखान्याचे अध्यक्ष नवले म्हणाले, ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारी यांच्या हितासाठी नफा तोटा न पाहता कारखाना चालवला जात आहे.
----------
फोटो -२८हळगाव
हळगाव येथील जय श्रीराम शुगर कारखान्याचे रोलर पूजन कार्यकारी संचालक के. एन. निंबे यांच्या हस्ते करण्यात आले.