शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आमदार संग्राम जगताप यांना अखेर जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 12:55 IST

राज्यभर गाजलेल्या केडगावमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्याकांडाच्या दोषारोपपत्रात नाव नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला.

अहमदनगर : राज्यभर गाजलेल्या केडगावमधील शिवसेना कार्यकर्त्यांच्या हत्याकांडाच्या दोषारोपपत्रात नाव नसल्याने राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर केला. आज सकाळी जगताप यांच्या वतीने अ‍ॅड. महेश तवले यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला. तसेच तपासात सहकार्य करणे व तपासात दबाव न आणणे या दोन अटी घालण्यात आल्या आहेत. दिवाणी न्यायाधीश एस.एस. पाटील यांनी जामीन मंजूर केला.केडगाव येथे ७ एप्रिल रोजी शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ता वसंत ठुबे यांची संदीप गुंजाळ याने गोळ्या घालून हत्या केली़ या घटनेनंतर गुंजाळ स्वत:हून पोलिसांत हजर झाला़ मयत संजय कोतकर यांचा मुलगा संग्राम कोतकर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप, आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह ३० व सहा अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला होता. या घटनेच्या तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती.  विशेष पथकाने फिर्यादीत नाव असलेले आठ, तर इतर दोन अशा दहा जणांना अटक केली.  हत्याकांडातील मयतांच्या कुटुंबीयांनी मात्र तपासी यंत्रणेवर आक्षेप घेतल्याने हा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) देण्यात आला. सीआयडीचे (पुणे) पोलीस उपाधीक्षक अरुणकुमार सपकाळे यांनी शुक्रवारी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्या प्राथमिक दोषारोपपत्रात आमदार संग्राम जगताप यांच्या नावाचा समावेश नव्हता. अन्य आठ आरोपींविरोधात सीआयडीने दोषारोपपत्र दाखल केले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांड