खर्डा : जामखेड तालुक्याची ग्रीन व्हॅली अशी ओळख असलेला खैरी मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, सांडव्याहून पाणी वाहू लागले आहे. त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
यंदा पावसाळ्याची सुरुवात चांगली झाली; मात्र त्यानंतर सलग दोन ते अडीच महिने पावसाने पाठ फिरविली. त्यामुळे खैरी मध्यम प्रकल्पाने तळ गाठला होता; परंतु मागील आठवड्यात धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले. या प्रकल्पाची ५३३.६ दशलक्ष घनमीटर इतकी पाणीसाठवण क्षमता आहे. सध्या पाण्याची पातळी ५६२.२ मीटर असून, उपयुक्तसाठा ४७३.२९ दशलक्ष घनमीटर आहे. खैरी मध्यम प्रकल्प परिसरात १९५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
धरण भरल्याने लाभक्षेत्रातील पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. येथून निघणाऱ्या २१ किलोमीटरच्या कालव्यातून जामखेड तालुक्यासह उस्मानाबाद जिल्ह्यातील काही गावांचा पाणी प्रश्न सुटला आहे. गेल्या वर्षीही खैरी धरण ओव्हरफ्लो झाले होते.
-----
फोटो आहे