शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जामखेडकरांना दिलासा; उद्यापासून उठणार हॉटस्पॉट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 14:29 IST

जामखेड : शहरात नगर जिल्ह्यात पहिला व सर्वाधिक १७ कोरोनाचे रुग्ण सापडले होते. आता अवघे पाच कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यांच्यावरील उपचार अंतिम टप्प्यात आहे. २६ एप्रिल ते १० मे पर्यंत तेरा दिवस एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे शहरातील महिनाभरापासून असलेले हॉटस्पॉट सोमवारपासून उठविण्यात आले आहे. तसा आदेशही प्रशासनाने रविवारी (दि.१० मे) जारी केला आहे. 

जामखेड : शहरात नगर जिल्ह्यात पहिला व सर्वाधिक १७ कोरोनाचे रुग्ण सापडले होते. आता अवघे पाच कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यांच्यावरील उपचार अंतिम टप्प्यात आहे. २६ एप्रिल ते १० मे पर्यंत तेरा दिवस एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे शहरातील महिनाभरापासून असलेले हॉटस्पॉट सोमवारपासून उठविण्यात आले आहे. तसा आदेशही प्रशासनाने रविवारी (दि.१० मे) जारी केला आहे.  जामखेड शहरात २८ मार्च ते २६ एप्रिल या काळात १७ करोनाचे रुग्ण आढळले होते. १७ रुग्णांपैकी दोन परदेशी नागरिक होते. त्यांच्या संपर्कात आलेल्या शहरातील स्थानिक १५ जणांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यातील एक जणाचा मृत्यू झाला आहे. त्यातील दहा जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर पाच जण उपचार घेत असून आहेत. पुढील आठ दिवसात जामखेड तालुका कोरोनामुक्त होईल, असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. १७ कोरोनाग्रतांच्या संपर्कात आलेल्या एकूण १८३ जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. आता ७३ जण क्वारंटाईनमध्ये आहेत.  जिल्हाधिका-यांनी १० एप्रिल रोजी जामखेड शहर हॉटस्पॉट केंद्र म्हणून  जाहीर केले होते. येथील रूग्ण संख्या वाढत गेली. त्याप्रमाणेच हॉटस्पॉटची मुदत तीन वेळा वाढवून १० मे पर्यंत केली होती. त्याची मुदत रविवारी रोजी संपत आहेत. गेल्या एक महिन्यापासून हॉटस्पॉट असलेल्या जामखेड शहरात नागरिकांचे हाल झाले. मात्र प्रशासनाने शासनाने दिलेल्या नियमांचे कठोर पालन केल्यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यास मोलाची मदत झाली असून शहराची कोनोरोमुक्तीकडे वाटचाल सुरु झाली आहे.  तहसीलदार विशाल नाईकवाडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सुहास जगताप, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहायक पोलीस निरीक्षक निलेश कांबळे, अवतारसिंग चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.युवराज खराडे या सात कर्त्यव्यदक्ष अधिकारी व त्यांच्या सर्व टीमने जामखेडकरांसाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर कोरोनाशी लढा दिला आहे. त्याचे फलित म्हणूनच कोरोनाची साखळी तुटण्यास प्रशासनाला यश आले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडcorona virusकोरोना वायरस बातम्या