शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

जामखेडमध्ये एकाच दिवशी दोघांना लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 13:20 IST

फायनान्स कंपनीच्या कर्मचा-याला जामखेड तालुक्यातील आघी- करमाळा रस्त्यावर मोटारसायकल अडवून मारहाण करून रोख २ लाख ३२ हजार रुपयांची बॅग पळवून नेली.

जामखेड : फायनान्स कंपनीच्या कर्मचा-याला जामखेड तालुक्यातील आघी- करमाळा रस्त्यावर मोटारसायकल अडवून मारहाण करून रोख २ लाख ३२ हजार रुपयांची बॅग पळवून नेली. तर दुस-या घटनेत आय.टी.आय. जवळ ट्रक चालकास बंदुकीचा धाक दाखवून लुटले. दोन्ही प्रकरणात एकूण सहा जणांच्या विरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, ९ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वादोन वाजता रेवन्नाथ हनुमंत सालगुडे (वय - ३१ रा- करमाळा) हे आपल्या फायनान्स कंपनीचे पैसे गोळा करण्यासाठी करमाळा येथून जामखेड तालुक्यात आले होते. सकाळी त्यांनी परीसरातील धोंडपारगाव, पिंपरखेड, हळगाव, येथील फायनान्सच्या खातेदारांचे पैसे गोळा करून आपल्या (एम. एच- ४५, एम- २२१०) या मोटारसायकल वरुन आघी - करमाळा रोडने जात होते. याचवेळी दोन अनोळखी इसम लाल रंगाच्या बिगर नंबरच्या पल्सर मोटारसायकलवरून तोंडाला काळ्या रंगाचा कपडा बांधून आले. मोटारसायकलला त्यांची गाडी आडवी लावून थांबवत लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. सालगुडे यांच्याजवळील २ लाख ३२ हजार ५५० रुपयांची लाल रंगाची बॅग हिसकाऊन मोटारसायकलवरून पळून गेले. याप्रकरणी दोन जणांविरोधात जामखेड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दुसरी घटना ही जामखेड शहराजवळच करमाळा रस्त्यावरील आय. टी. आय भागात घडली. प्रदर्शन संदिपान संत, (वय-२९ रा.भोजगाव. ता गेवराई, जि, बीड) हे १० सप्टेंबर रोजी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास जामखेड - करमाळा रोडवरून सळईने भरलेला ट्रक (एम. एच.- ०४, जी. एफ.- ३५६) हा घेऊन करमाळा मार्गे नातेपुते या ठिकाणी जात होते. याचवेळी एक पांढ-या रंगाच्या बिगर नंबरच्या चार चाकी इंडीका कारमधून चार इसम आले. त्यांनी आपली चार चाकी गाडी ट्रकला आडवी लावली. प्रदर्शन संत यांना पिस्तूल चा धाक दाखवून ट्रक ची काच फोडली. ट्रकचालकाच्या जवळ आसलेले साडेसहा हजार रुपये घेऊन आरोपी चारचाकी वाहनाने पळून गेले. या प्रकरणी चार जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नऊ महिन्यांपुर्वी लुटले होते दागिनेनऊ महिन्यांपूर्वी म्हणजे ९ डिसेंबर २०१७ रोजी पुणे येथुन मेव्हणीच्या लग्नसमारंभासाठी चाललेल्या नायगाव येथील कुटुंबीयांची कार खर्डा रोडवरील दरडवाडी या ठिकाणी अडवली होती. सहा दरोडेखोरांनी महीलांच्या अंगावरील दागिने ओरबडुन पावणेदोन लाख रुपयांंचा एवज चोरुन नेला होता. खर्डा रोड व करमाळा रोडवर लुटमारीच्या सारख्या घटना घडत असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड