शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

जामखेडमध्ये राष्ट्रवादी पुन्हा, नगराध्यक्ष व दहा नगरसेवकांनी राम शिंदे यांची साथ सोडली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 17:09 IST

जामखेड : शहराच्या विकासासाठी नगराध्यक्ष निखील घायतडक व त्यांचे दहा समर्थक नगरसेवकांनी माजी मंत्री राम शिंदे यांची तीन वर्षांपासून असलेली साथ सोडून राजीनामा नाट्याला कलाटणी दिली. आगामी काळात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे ठरविले असल्याचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

जामखेड : शहराच्या विकासासाठी नगराध्यक्ष निखील घायतडक व त्यांचे दहा समर्थक नगरसेवकांनी माजी मंत्री राम शिंदे यांची तीन वर्षांपासून असलेली साथ सोडून राजीनामा नाट्याला कलाटणी दिली. आगामी काळात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचे ठरविले असल्याचे नगराध्यक्ष निखिल घायतडक यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

 नगराध्यक्ष निखिल घायतडक म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून राजकीय दबाव येत असल्याने पदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले होते. यामुळे समर्थक दहा नगरसेवकांनी देखील तातडीने आपल्या नगरसेवक पदांचे राजीनामे माझ्याकडे दिले होते. दरम्यान नगराध्यक्ष कधी राजीनामा देतात याकडे भाजपचे लक्ष होते. परंतु त्यांनी आपला राजीनाम्याचा निर्णय फिरवत पुन्हा राष्ट्रवादीतच राहण्याचा निर्णय घेऊन साडेतीन वर्षांपासून भाजप बरोबर असलेले संबध तोडले आहेत.      नगराध्यक्ष निखिल घायतडक व दहा नगरसेवकांची आज सोमवारी बैठक झाली. या बैठकीत विचारविनिमय होऊन नगरपरिषदेचा कार्यकाळ काही महिन्यांवर आला असल्याने शहराच्या विकासकामात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आपण सर्वजण मिळून एकजुटीने काम करू असे बैठकीत ठरले. त्यामुळे नगराध्यक्ष निखिल घायतडक सह इतर दहा नगरसेवकांनी आपले राजीनामे न देता आमदार रोहित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचे ठरले आहे.     

नगराध्यक्ष निखल घायतडक यांनी दोन वषार्पूर्वी नगरपरिषदेचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी होते. त्यानुसार निखिल घायतडक नगराध्यक्ष झाले होते. गेल्या तीन महिन्यांपासून निखिल घायतडक यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, यासाठी दबावतंत्र चालू होते. लॉकडाऊनमुळे थांबलेले दबावतंत्र दोन दिवसात पून्हा सूरू झाले. याबाबत नगराध्यक्षांनी आपल्या सहकारी नगरसेवकांना याची कल्पना दिली. त्यानुसार माजी नगराध्यक्षा प्रीती विकास राळेभात, नगरसेवक शामीर सय्यद, संदीप गायकवाड, ऋषिकेश बांबरसे, गूलशन अंधारे, लता संदीप गायकवाड, सुरेखा भाऊराव राळेभात, सुमन आशोक शेळके , मेहरुनिसा शफी कूरेशी, जकीया आयुब शेख, या दहा नगरसेवकांनी आपले राजीनामे नगराध्यक्ष निखिल  घायतडक यांच्याकडे दिले होते.