शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जामखेड गृपने पूर्ण केली सर्वात उंच आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 17:45 IST

जगातील सर्वात उंच १२ हजार फूट उंचीवरील, २३ देशातील स्पर्धकांचा सहभाग असलेली आणि कमी आॅक्सिजन असलेल्या लद्दाख येथील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा जामखेडमधील सहा जणांच्या टिमने पूर्ण केली.

जामखेड : जगातील सर्वात उंच १२ हजार फूट उंचीवरील, २३ देशातील स्पर्धकांचा सहभाग असलेली आणि कमी आॅक्सिजन असलेल्या लद्दाख येथील आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा जामखेडमधील सहा जणांच्या टिमने पूर्ण केली. २१ किमी आणि ७ किमी अंतराच्या स्पर्धेत सहभाग घेत यशस्वीपणे पूर्ण करत मेडल मिळवले.जामखेड मॅरेथॉन गृपचे डॉ. पांडुरंग सानप यांच्या नेतृत्वाखाली प्राचार्य आप्पासाहेब शिरसाट, डॉ. दिनेश रसाळ, डॉ. अशोक बांगर, डॉ. प्रविण मिसाळ, डॉ. राजकुमार सानप आणि तलाठी इराप्पा काळे यांनी बर्फाळ व डोंगराळ प्रदेशात, कमी आॅक्सीजन असलेल्या लद्दाख येथे होत असलेल्या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी आॅनलाईन फॉर्म भरले. स्पर्धेचे स्थान निश्चित झाल्यानंतर लद्दाखला ९ सप्टेंबर रोजी पोहचले.१० सप्टेंबर रोजी सकाळी या आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत जामखेडचे मॅरेथॉन गृप सहभागी झाला. चढउताराचा हा डोंगरी भाग असलेल्या ठिकाणी २३ देशातील स्पर्धकांसह देशातील सहा हजार स्पर्धक सहभागी झाले होते. डॉ. सानप यांनी २१ किमी मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेत अंतर अडीच तासात पूर्ण केले. अप्पासाहेब शिरसाट, डॉ. रसाळ, डॉ. बांगर, डॉ. मिसाळ, सानप व काळे यांनी ७ किमी स्पर्धेत सहभागी होत हे अंतर ३५ मिनिटांत पूर्ण केले.जामखेड येथील मॅरेथॉन ग्रुपचे सदस्य मागील दोन वर्षापासून मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होऊन स्पर्धा पूर्ण करतात. या ग्रुपमध्ये डॉ. पांडुरंग सानप हे नेहमी २१ कि.मी. स्पर्धेत सहभागी होऊन अल्प कालावधीत शर्यत पूर्ण करतात. मेडल मिळाले नाही तरी सहभागाचा आनंद घेतात. जामखेड येथील औद्योगिक वसाहतीची असलेली खुली ४० एकर क्षेत्रात जामखेड मॅराथॉन गृप दररोज सराव करतो. ‘लोकमत’ आयोजीत औरंगाबाद मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला होता. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेड