शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडीसेविकांचे जेलभरो आंदोलन; मानधनवाढीसह इतर मागण्या, २० दिवसांपासून निघेना संपावर तोडगा

By चंद्रकांत शेळके | Updated: December 29, 2023 17:21 IST

जिल्हा परिषदेच्या आवारात शुक्रवारी सकाळी मोठ्या संख्येने अंगणवाडीसेविका जमा झाल्या. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला.

अहमदनगर : किमान वेतन म्हणून अंगणवाडी सेविकांना २६ हजार व मदतनीसांना २२ हजार रुपये मानधन मिळावे, पोषण आहाराची रक्कम वाढविणे यासह इतर मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस कर्मचाऱ्यांनी ४ डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. मात्र गेल्या २० दिवसांत शासनाने यावर तोडगा काढला नसल्याने राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने अंगणवाडीसेविकांनी शुक्रवारी जिल्हा परिषदेसमोर जेलभरो आंदोलन केले.

जिल्हा परिषदेच्या आवारात शुक्रवारी सकाळी मोठ्या संख्येने अंगणवाडीसेविका जमा झाल्या. सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी शासनाच्या धोरणाचा निषेध नोंदविला. मागण्या मान्य न झाल्यास ३ जानेवारीपासून मुंबई येथे आझाद मैदानावर आंदोलनाचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. आंदोलन करणाऱ्या बहुतांश अंगणवाडीसेविकांना कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतले व गेटच्या बाहेर सोडून दिले. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अंगणवाडी सेविकांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे राज्य उपाध्यक्ष निलेश दातखिळे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलकांनी महिला व बालकल्याण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी मनोज ससे यांना निवेदन दिले. ४ डिसेंबरपासून अंगणवाडीसेविकांचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी शासनाला वेळोवेळी निवेदने देऊन मोर्चे काढले. आंदोलनेही केली. नुकताच हिवाळी अधिवेशनात नागपूरला मोर्चाही काढला. मात्र शासन व प्रशासन पातळीवरून अद्याप मागण्या मान्य झालेल्या नाहीत.

५ हजार अंगणवाड्यांतील आहार बंदजिल्ह्यात ४ हजार ५६१ मोठ्या व ८१४ मिनी अशा एकूण ५ हजार ३७५ अंगणवाड्या असून, त्यामध्ये सेविका व मदतनीस यांची एकूण संख्या ९ हजार ६९८ इतकी आहे. हे सर्वच कर्मचारी संपात असल्याने अंगणवाडीत दिला जाणारा दैनंदिन बालकांचा पोषण आहार बंद आहे. तसेच इतर कामेही ठप्प झालेली आहेत.या आहेत प्रमुख मागण्याअंगणवाडी सेविकांना २६ हजार व मदतनीसांना २० हजार रुपये मानधन मिळावे, पोषण आहाराची रक्कम वाढविणे, निवृत्तीवेतन देणे, दरवर्षी ३० दिवसांची आजारपणाची पगारी रजा मिळावी, सेविकेमधून मुख्य सेविकेची पदोन्नती करावी, दहावी उत्तीर्ण मदतनिसांना सेविकापदी थेट नियुक्ती द्यावी, नवीन मोबाईल देणे या प्रमुख मागण्या आहेत. 

टॅग्स :agitationआंदोलनAhmednagarअहमदनगर