शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

जायकवाडीच्या फुगवट्याचे पाणी पिकात; घरातही शिरले पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 12:44 IST

जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून फुगवट्याचे पाणी दहिगावने, भावीनिमगाव, ढोरसडे, हिंगणगाव आदी परिसरातील शेतातील उभ्या पिकांमध्ये घुसले आहे.

नानासाहेब चेडे । दहिगावने : जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले असून फुगवट्याचे पाणी दहिगावने, भावीनिमगाव, ढोरसडे, हिंगणगाव आदी परिसरातील शेतातील उभ्या पिकांमध्ये घुसले आहे. काही घरांमध्येही पाणी शिरले आहे.जायकवाडी धरणाची उभारणी झाली आणि नगर जिल्ह्यातील काही भागासह मराठवाड्यातील जवळपास पाच जिल्ह्यांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीला हक्काचे पाणी मिळाले. यंदा धरणात पूर्ण क्षमतेने पाणी साठविल्याने ‘बॅक वॉटर’चा भाग असलेल्या शेवगाव तालुक्यातील दहिगावने, ढोरसडे, भावीनिमगाव येथील शेतातील उभी पिके पाण्याखाली गेली आहेत. येथील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जायकवाडी प्रशासन धरणात क्षमतेपेक्षा अधिक पाणीसाठा ठेवत असल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे, असे येथील शेतकरी म्हणतात. धरणाच्या निर्मितीसाठी ज्यांनी जमिनी दिल्या त्यातील अनेकांचे पुनर्वसन न झाल्याने वाडी, वस्तीवरील लोक पाण्याच्या विळख्यात अडकले आहेत.अधिकाºयांतील समन्वयाअभावी पुनर्वसन अजूनही रखडले आहे. योग्य पुनर्वसन होऊ न शकल्याचे कटू सत्य आहे. ग्रामस्थांना धरणाचे पाणी अस्वस्थ करत आहे. सुमारे वीस वर्षांपासून त्यांचा पुनर्वसनासाठीचा लढा सुरू आहे. येथील लोकप्रतिनिधींनींही या प्रश्नांच्या संदर्भात मंत्रालयात बैठका लावल्या. मात्र कोणताही निर्णय न झाल्याने अद्यापही पुनर्वसनाचे घोंगडे भिजतच राहिले. जायकवाडी धरणात जास्त पाणी साठल्यामुळे पिके हातून गेली आहेत. शेतकरी दुहेरी संकटाचा सामना करत आहेत. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तालुक्यातील राजकीय नेते मंडळींनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, अशी मागणी शेतकरी करत आहेत.संपादित झालेली जमीन सोडून ४२ गुंठे जमीन शिल्लक आहे. पैकी १० गुंठे क्षेत्रात जायकवाडीचे पाणी आल्याने पीक सडून गेले. उर्वरित संपूर्ण पिकाचे ओलाव्याने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतात जाण्यासाठी छातीइतक्या पाण्यातून जावे लागते. ही सर्व परिस्थिती माजी मंत्री सुभाष देशमुख व चंद्रकांत पाटील यांना भेटून सांगितली. मात्र आश्वसनाव्यतिरिक्त काहीच पदरी पडले नाही, असे भावीनिमगावचे शेतकरी धरणग्रस्त शेतकरी अनंता व्यवहारे यांनी सांगितले. जायकवाडी धरणातील पाणी पातळी कमी करण्यासाठी तेथील अभियंत्यांशी चर्चा करणार आहे. त्या भागातील नुकसानग्रस्त पिकांची शेतक-यांना भरपाई मिळण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत, असे शेवगावचे तहसीलदार विनोद भामरे यांनी सांगितले.   

टॅग्स :Jayakwadi Damजायकवाडी धरणwater shortageपाणीकपात