शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
2
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
3
चीन अन् पाकसह भारतीय सैन्यही बेलारूसला पोहचले; रशियाच्या खेळीनं NATO देशांची धडधड वाढली, कारण...
4
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
5
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
6
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
7
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
9
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
10
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
11
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
12
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न
13
समृद्धी महामार्गावर खिळे ठोकून दुरुस्ती की घातपाताचा प्रयत्न? अनेक वाहने पंक्चर, प्रवासी संतप्त
14
पितृपक्ष 2025: श्राद्धाचा नैवेद्य ठेवताना डावीकडून उजवीकडे पाणी फिरवतात; का ते माहितीय का?
15
नवी मुंबईतील 'त्या' बांधकामांना 'ओसी' देऊ नये; विधान परिषद सभापतींचे आदेश
16
Panvel: जेवताना चिकन कमी वाढले, पत्नीला जाळून मारले; फरार आरोपीला हैदराबादमध्ये अटक
17
नोकरी गेल्यानंतर पीएफमधील पैशांवर व्याज मिळते? काय आहे ईपीएफओचे नियम?
18
भारताच्या वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने दिली 'गुड न्यूज'; पत्नीच्या मॅटर्निटी फोटोशूटची चर्चा
19
फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग यांची जबरदस्त ऑफर! फक्त हे काम करून दर तासाला ५ हजार रुपये मिळवा
20
तमाशातील नर्तकीवर प्रेम, पण ती टाळायला लागल्याने माजी उपसरपंच झाला वेडापिसा, त्यानंतर तिच्या घरासमोरच उचललं टोकाचं पाऊल

जय अंबे, जय जगदंबे, जय मातादी.. या घोषणांनी मोहटादेवी परिसर दुमदुमला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2019 14:31 IST

मोहटादेवी गडावर रविवारी सकाळी मंगलमय वातावरणात, मंत्रोच्चाराच्या जयघोषात नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला. देवस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अशोक भिल्लारे व त्यांच्या पत्नी अस्मिता भिल्लारे यांच्या हस्ते विधीवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. यावेळी जय अंबे,जय जगदंबे, जय मातादी.. या घोषणांनी मोहटादेवी परिसर दुमदूमून गेला होता.

पाथर्डी : तालुक्यातील मोहटादेवी गडावर रविवारी सकाळी मंगलमय वातावरणात, मंत्रोच्चाराच्या जयघोषात नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला. देवस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अशोक भिल्लारे व त्यांच्या पत्नी अस्मिता भिल्लारे यांच्या हस्ते विधीवत पूजा करून घटस्थापना करण्यात आली. यावेळी जय अंबे,जय जगदंबे, जय मातादी.. या घोषणांनी मोहटादेवी परिसर दुमदूमून गेला होता.रविवारी सकाळी सहा ते आठ गणपती पूजन करण्यात आले. घटस्थापनेचा महासंकल्प करण्यात आला. त्यानंतर मोहटे गावातून देवीच्या मुखवट्याची सुवर्ण अलंकारासह सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीसमोर रेणुका विद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी लेझीम पथक, झांज पथक, ढो्रल पथक सादर केले. मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घटस्थापनेला प्रारंभ करण्यात आला. पौराहित्य शरददेवा कोतनकर, विवेक मुळे, बबनदेवा कुलकर्णी, भूषणदेवा साखरे व बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. यावेळी औरंगाबाद येथील न्यायाघीश श्रीकांत कुलकर्णी, सर्व विश्वस्त, ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.  देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या धामणगांव देवी, चौंडेश्वरी मंदिर, गाडगेआई मंदिर, तिळवण तेली समाज मंदिर येथेही घटस्थापना करण्यात आली.भाविकांच्या गर्दीने रस्ते फुललेशनिवारी रात्रीपासून अहमदनगर-पाथर्डी तसेच शेवगाव-पाथर्डी हे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. बहुसंख्य भाविक हे पायी चालत आले होते. शनिवारी दुपारी नगरहून निघालेले भाविक सकाळी गडावर पोहोचले. राज्याच्या विविध जिल्ह्यातील भाविक गडावर येवून पेटती ज्योत घेवून जात होते. विशेष म्हणजे ही पेटती ज्योत घेवून तरूण पायी चालत आपल्या गावाकडे जात असताना दिसून आले. चालू वर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे गडावर भाविकांची गर्दी वाढल्याचे दिसून आले. 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर