अहमदनगर : राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. रविवारी सायंकाळी झालेल्या चहापान कार्यक्रमात आ. संग्राम जगताप यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन नगर शहराच्या विकासाबाबत चर्चा केली.
आ. जगताप हे हिवाळी अधिवेशनानिमित्त रविवारी मुंबईत दाखल झाले. अधिवेशनासाठी आयोजित चहापानाच्या कार्यक्रमास जगताप यांनी उपस्थिती लावत मुख्यमंत्री ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली. शहर विकासासाठी भरीव निधीची मागणी केल्याचे जगताप यांनी सांगितले. मागील अधिवेशनातही जगताप यांनी महापालिकेच्या आर्थिक स्थितीकडे शासनाचे लक्ष वेधले होते. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीत जगताप यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केली होती. तसेच महापालिकेच्या कारभाराबाबतही पालकमंत्र्यांकडे तक्रार केली होती.
..
१३ संग्राम जगताप