शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी सुकाणू समितीची जागर यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 21:27 IST

शेतक-यांच्या कर्जमाफीची फसवी घोषणा करून सरकारने शेतक-यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफी करावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटनांची सुकाणू समिती महिनाभर राज्यभरात जनजागृती करणार आहे.

अहमदनगर : शेतक-यांच्या कर्जमाफीची फसवी घोषणा करून सरकारने शेतक-यांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे सरसकट कर्जमाफी करावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटनांची सुकाणू समिती महिनाभर राज्यभरात जनजागृती करून शेतक-यांनी रुपयाचेही कर्ज भरू नये, असे आवाहन करणार असल्याची माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा सुकाणू समितीचे ज्येष्ठ सदस्य रघुनाथदादा पाटील यांनी दिली.या जागर यात्रेची नियोजन बैठक शनिवारी नगरमध्ये सरकारी विश्रामगृहावर झाली. त्यात पाटील यांनी आंदोलनाची रूपरेषा विशद केली. शेतमालाला दमडीचा भाव देऊन आतापर्यंतच्या सर्वच सरकारांनी शेतक-यांची लूट केली. त्याचाच उद्रेक म्हणून १ जूनला महाराष्ट्रात शेतकरी बंद झाला. या बंदमुळे हादरलेल्या सरकारने घाईघाईत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यात शेकडो अटी टाकल्या. गेल्या दहा महिन्यांपासून या कर्जमाफीचा घोळ सुरूच आहे. आपले नाव कर्जमाफीच्या यादीत आले नाही म्हणून या दहा महिन्यांत राज्यात तीन हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे आता सुकाणू समितीने संपूर्ण कर्जमाफीचा विडा उचलला आहे.सुकाणू समिती शहीद दिनापासून (२३ मार्च) राज्यव्यापी हुतात्मा अभिवादन व शेतकरी जागर यात्रा काढणार आहे. महिनाभराच्या या जागर यात्रेत एकाही शेतक-याने पीक कर्ज, तसेच शेतीचे वीजबिल भरू नये, असे आवाहन केले जाईल. उलट सरकारने शेतक-यांना आतापर्यंत कमी भाव देऊन जी लूट केली, ती लूट परत करावी, अशी मागणी सरकारकडे केली जाईल. या यात्रेत राज्यातील ३० जिल्हाधिकारी कार्यालयांवर आंदोलन, हुतात्मा स्मारकांना भेटी, तसेच जिल्हानिहाय शेतक-यांच्या सभा होणार आहेत. सांगलीपासून जागर यात्रेस प्रारंभ होऊन पुणे येथे समारोप होणार आहे. दि. २१ एप्रिलला ही जागर यात्रा नगरला येणार असल्याचेही पाटील म्हणाले.बैठकीस शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख बाळासाहेब पटारे, गणेश जगताप, प्रा. सुशीला मोराळे, किशोर ढमाले, कॉ. बाबा आरगडे, बच्चू मोढवे, विष्णूपंत ढवळे, नितीन पटारे, विलास कदम, युवराज जगताप, जगन्नाथ कोरडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर