शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

पाटबंधारे विभागाने फतवा मागे घेतला; शेतकरी आंदोलनानंतर निर्णय बदलला

By शिवाजी पवार | Updated: August 16, 2023 15:36 IST

सिंचन न केलेल्या क्षेत्राबद्दलचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश शेतकऱ्यांना बजावण्यात आले होते. या आदेशाची शेतकऱ्यांनी होळी केल्यानंतर अभियंत्यांनी आपला निर्णय मागे घेतला.

श्रीरामपूर : पाटबंधारे विभागाच्या नगर येथील कार्यकारी अभियंत्यांनी भंडारदराच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावरील सर्वच क्षेत्रांवर सिंचन कर आकारणीचा अजब फतवा काढला होता. सिंचन न केलेल्या क्षेत्राबद्दलचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश शेतकऱ्यांना बजावण्यात आले होते. या आदेशाची शेतकऱ्यांनी होळी केल्यानंतर अभियंत्यांनी आपला निर्णय मागे घेतला.    कार्यकारी अभियंत्यांनी ८ ऑगस्टला हे आदेश बजावले होते. वडाळा पाटबंधारे उपविभागाच्या अधिकाऱ्यांना त्याची प्रत प्राप्त देण्यात आली होती. ही माहिती मिळताच भंडारदरा धरण लाभक्षेत्र पाणी समितीच्या कार्यकर्त्यांनी आदेशाची येथे होळी केली. यावेळी स्वाभिमानीचे नेते सुरेश ताके, जितेंद्र भोसले, भरत आसने, दत्तात्रय लिप्टे, किशोर पाटील, रवी वाबळे, राजेंद्र भांड, संदीप गवारे, जगन्नाथ भोसले, ईश्वर दरंदले, नामदेव येवले, किशोर बडाख आदी शेतकरी उपस्थित होते. यामुळे आदेश मागे घेतल्याचे परिपत्रक अभियंत्यांनी आता काढले आहेत.

    भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रातील सिंचन महसूल वाढविण्याच्या उद्देशाने आदेश पारित करण्यात आले होते. लाभधारक शेतकऱ्यांच्या मूळ सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र व सिंचन अकारणी करण्यात आलेले क्षेत्र यामध्ये तफावत दिसून येत आहे. लाभधारक शेतकऱ्यांनी उताऱ्यावरील क्षेत्राचे सिंचन कशाच्या आधारे केले, याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश वडाळा पाटबंधारेच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले होते.      उताऱ्यावरील क्षेत्र आणि कर अकारणी यात तफावत येणार नाही याची खात्री करून तक्ते विभागीय कार्यालयास मंजुरीस सादर करावेत, तसेच लाभ क्षेत्रातील सर्वच क्षेत्रांची अकारणी करण्यात यावी, असे कार्यकारी अभियंत्यांना म्हटले आहे.     दरम्यान, लाभक्षेत्रातील शेतकऱ्याने जर धरणाच्या आवर्तनातून सिंचन केले नाही, तर त्याने हंगामामध्ये पाणी न घेतल्याचे हमीपत्र या आदेशानुसार सादर करावयाचे होते. आदेशाची प्रत पाटबंधारेच्या अकोले, संगमनेर, लोणी व देवळाली प्रवरा येथील कार्यालयांनाही पाठविण्यात आली होती.सर्व क्षेत्रावर सिंचन करभंडारदराच्या आवर्तनातून भिजलेल्या जमिनीच्या क्षेत्रावर सिंचन कर लावला जात होता. आवर्तन सुटण्यापूर्वी शेतकऱ्यांकडून पाणी मागणी अर्ज मागविले जातात. या अर्जानुसार भिजलेल्या क्षेत्रानुसार पैसे अकारले जात होते. मात्र नव्या आदेशानुसार भिजलेल्या क्षेत्राऐवजी शेतकऱ्यांच्या संपूर्ण सातबारा उताऱ्यावर सिंचन कर लादला जाणार होता.

अभियंत्यांचा खुलासाआवर्तनातून भिजलेले क्षेत्र व उताऱ्यावरील क्षेत्र याबाबतची खातरजमा करण्यासाठी पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले होते. मात्र आदेशाचा क्षेत्रीय स्तरावरून चुकीचा अर्थ काढण्यात आला. कोणत्याही लाभधारकांकडून सातबारा उताऱ्याची मागणी केली जाणार नाही, असे कार्यकारी अभियंत्यांनी दुसऱ्या आदेशात म्हटले आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरFarmerशेतकरी