शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पैसे दुप्पटच्या आमिषाने गुंतवणूकदारांना एक कोटीचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2017 18:05 IST

जनसहारा अ‍ॅग्रो सोसायटी घोटाळा: कंपनीच्या अध्यक्षांसह संचालकांवर गुन्हा

ठळक मुद्देजनसहारा मल्टीस्टेट अ‍ॅग्रो पर्पज को आॅप सोसायटीचे येथील मार्केटयार्ड येथील हमाल पंचायत भवन, पहिला मजला येथे कार्यालय आहे़ या कंपनीच्या विविध योजनांच्या माध्यमातून सहा वर्षांत दुप्पट पैसे मिळतील असे गुंतवणूकदारांना आमिष दाखविले़

अहमदनगर : सहा वर्षांत दुप्पट पैसे देण्याच्या आमिषाने विविध योजनातंर्गत गुंतवणूकदारांची तब्बल १ कोटी ४ लाख ६७ हजार रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जनसहारा मल्टीस्टेट अ‍ॅग्रो पर्पज को. आॅप सोसायटीच्या अध्यक्षांसह संचालक अशा नऊ जणांविरोधात येथील कोतवाली पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल झाला आहे़पैशाची फसवणूकप्रकरणी दत्तात्रय अप्पाजी दहिफळे (वय ५० रा़ महिदा ता़ आष्टी जि़ बीड) यांनी फिर्याद दाखल केली असून, जनसहारा मल्टीस्टेट अ‍ॅग्रो पर्पज को. आॅप सोसायटीची अध्यक्षा वंदना सिंग कुशवाह (रा़शहापुरा, भोपाळ, मध्यप्रदेश), संचालक निर्मला सोनी (रा़ काला पिपल मंडी जि़ शहापूर, मध्यप्रदेश), जसपालसिंग संदू (ग्वाल्हेर, मध्यप्रदेश), नरंजन सक्सेना, प्रेम गिबनरे, विवेक माधुर, मयेक जोहरी, सुधीर पाल व मनविरसिंग (सर्व रा़भोपाळ, मध्यप्रदेश) यांच्यावर कलम ४२०, ४०९,१२० ब, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे़जनसहारा मल्टीस्टेट अ‍ॅग्रो पर्पज को आॅप सोसायटीचे येथील मार्केटयार्ड येथील हमाल पंचायत भवन, पहिला मजला येथे कार्यालय आहे़ या कंपनीच्या विविध योजनांच्या माध्यमातून सहा वर्षांत दुप्पट पैसे मिळतील असे गुंतवणूकदारांना आमिष दाखविले़ कोणत्या योजनेतंर्गत पैसे भरले असता पैसे परत कधी मिळणार आणि किती मिळणार याचे गुंतवणूकदारांना प्रमाणपत्रही दिले़ मात्र मुदत संपूनही पैसे न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याची बाब गुंतवणूकदारांच्या लक्षात आली़ याप्रकरणी दहिफळे यांनीच फिर्याद दाखल केली आहे़ या कंपनीत आणखी अनेक जणांनी पैसे गुंतविले असून, त्यांचीही अशाच पद्धतीने फसवणूक झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, पोलीस या कंपनीचे अध्यक्ष, संचालक यांचा शोध घेत आहेत़