गरड यांनी निवेदनात म्हटले आहे की, ‘लोकमत’ने गेल्या काही दिवसांत जिल्ह्यातील टँकर घोटाळा चव्हाट्यावर आणला. यात टँकर खेपांसाठी बनावट जीपीएस अहवाल वापरले गेले. त्याच धर्तीवर नेवासा येथे २०११ ते २०१७ या काळात खासगी टँकरने केलेल्या पाणीपुरवठ्यात गैरव्यवहार झाला आहे. पाणीपुरवठ्याचे बिल प्राप्त करण्यासाठी ठेकेदाराने येथील कर्मचाऱ्यांना हातशी धरून एकही जीपीएस लोकेशन रिपोर्ट सादर केलेला नाही. मूळ जीपीएस लोकेशन अहवालाऐवजी मायक्रोसाॅफ्ट एक्सेल, वर्ल्ड फाईलमध्ये माहिती तयार करून त्याच्याच प्रति बिलासोबत जोडलेल्या आहेत. त्यामुळे नेवासा पंचायत समितीतील पाणीपुरठ्याचे अधिकारी, कर्मचारी, संबंधित टँकरने पाणीपुरवठा करणारी ठेकेदार कंपनी, लेखा परीक्षक यांच्यावर जनतेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी गरड यांनी केली आहे.
-----------
तक्रारीला केराची टोपली
याबाबत गरड यांनी आपले सरकार पोर्टलवर तक्रार केली होती. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने, जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने त्यांचा अर्ज निकाली काढला; परंतु त्यात कोणतीही भरीव कारवाई न करता तक्रारीला केराची टोपली दाखविली, असेही गरड यांनी निवेदनात म्हटले आहे.