शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्हा बँकेची एसआयटी मार्फत चौकशी करा; अनुसूचित जाती, जमाती आयोगाकडेही तक्रार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2020 11:13 IST

अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या प्रशासनाने नोकर भरतीत प्रचंड मनमानी केली आहे. मात्र, सहकार विभागाच्या अधिका-यांनी बँकेला पाठीशी घातले आहे. त्यामुळे ‘एसआयटी’ मार्फत बँकेतील या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने सहकार आयुक्तांकडे केली आहे.

अहमदनगर : जिल्हा सहकारी बँकेच्या प्रशासनाने नोकर भरतीत प्रचंड मनमानी केली आहे. मात्र, सहकार विभागाच्या अधिका-यांनी बँकेला पाठीशी घातले आहे. त्यामुळे ‘एसआयटी’ मार्फत बँकेतील या घोटाळ्याची चौकशी करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने सहकार आयुक्तांकडे केली आहे. वंचित बहुजन आघाडीने  बँकेची अनुसूचित जाती, जमाती आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. जिल्हा बँकेने २०१७ मध्ये ४६५ जागांच्या भरतीसाठी प्रक्रिया सुरु केली होती. या भरतीतील अनियमिततेवर ‘लोकमत’ने वारंवार प्रकाश टाकला आहे. भरतीबाबत तर आक्षेप आहेतच. मात्र, गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतरही मोठ्या प्रमाणावर अनियमितता करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील विशाल बहिरम हा आदिवासी युवक ज्युनिअर आॅफिसर पदासाठी अनुसूचित जमाती प्रकल्पग्रस्त संवर्गात गुणवत्ता यादीत प्रथम आला होता. मात्र, बँकेने त्याला नियुक्तीपत्रच पाठविले नाही. आम्ही या उमेदवाराला साध्या टपालाने नियुक्तीपत्र पाठविले असे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांचे म्हणणे आहे. ज्याची काहीही पोहोच बँकेकडे नाही. त्यामुळे बहिरम हा गुणवत्ता यादीत येऊनही त्याला नियुक्ती मिळालेली नाही. त्याच्या जागेवर कुणाला नियुक्ती दिली याचे काहीही स्पष्टीकरण बँक प्रशासन करत नाही. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी सहकार आयुक्तांकडे तक्रार केली असून या सर्वच घोटाळ्याची एसआयटीमार्फत चौकशी करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. बँकेच्या भरतीत प्रोबेशनरी प्रथम श्रेणी अधिकारी पदावर निवड झालेला एक उमेदवार सेवेत हजर होत नसतानाही त्याला हजर  होण्यासाठी तब्बल दहा महिन्याची विशेष मुदतवाढ देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने गत २० मार्चच्या बैठकीत घेतला आहे. याबाबतही चौकशीची मागणी भोस यांनी केली आहे. बँक भरतीची जी फेरचौकशी झाली. त्या फेरचौकशीत सहकार विभागाने भरतीच्या संशयास्पद उत्तरपत्रिका सरकारी ऐवजी खासगी एजन्सीकडून तपासून घेतल्या याबाबतही त्यांनी यापूर्वीच तक्रार नोंदवलेली आहे. संचालकांविरोधात तक्रार करणार अनुसूचित जमातीच्या उमेदवारावर अन्याय करणे हा गुन्हा आहे. विशाल भैरम याला बँकेने नियुक्ती का दिली नाही? बँकेने साध्या टपालाने नियुक्ती पत्रे का पाठवली? असा किती उमेदवारांवर अन्याय केला गेला आहे? याबाबत वंचित बहुजन आघाडी बँकेच्या संचालकांविरोधात अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. अरुण जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ही तर जिल्ह्याची नामुष्की जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात शिक्षित व दिग्गज मंडळी असताना एवढ्या गंभीर चुका होत असतील तर ही आपल्या जिल्ह्याची मोठी नामुष्की आहे. सभासदांनी लोकशाही मार्गाने निवडून दिलेले संचालक मंडळ नेमके काय करत आहे? भरती प्रक्रियेत एका आदिवासी उमेदवारावर अन्याय केला जातो हे दुर्दैव आहे. माध्यमे जागल्याची भूमिका बजावत असल्याने बँकेचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. या आदिवासी उमेदवाराने कायदेशीर कारवाई करणे आवश्यक आहे. बँकेच्या कारभाराची व सर्व आरोपांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी होणे आवश्यक आहे, असे अ‍ॅड. सुरेश लगड यांनी सांगितले.     

टॅग्स :AhmednagarअहमदनगरbankबँकLabourकामगार