शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

शिर्डी विमानतळावरून लवकरच आंतरराष्ट्रीय उड्डाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 03:38 IST

साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी नवीन टर्मिनल व कार्गो सेवा सुरू करण्यासाठी येत्या एप्रिलपासून काम सुरू होईल,

शिर्डी : साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी नवीन टर्मिनल व कार्गो सेवा सुरू करण्यासाठी येत्या एप्रिलपासून काम सुरू होईल, अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी दिली़राज्यात मुंबई, पुणे, नागपूरनंतरचे शिर्डी चौथे तसेच देशातील वेगाने वाढणारे एकमेव विमानतळ ठरले असल्याचे काकाणी यांनी सांगितले़ धावपट्टीबरोबरच टर्मिनलचा विस्तार करण्यात आला आहे. अत्याधुनिक रडार यंत्रणा बसविण्यात आली आहे़ विमानतळावर वीज निर्मितीसाठी सोलर प्लॅन्ट बसविण्यात आला आहे. परिसरातील विहिरींचे पुनर्भरण करण्यात आले आहे़ नोव्हेंबरमध्ये नाईट लँडिंगचे काम पूर्ण होऊन डिसेंबरअखेर यासाठी परवाना मिळेल. आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी नवीन टर्मिनल व शेतमालासाठी कार्गो सेवा सुरू करण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे़ यासाठी २०० कोटींचा आराखडा बनविला आहे. एप्रिलमध्ये काम सुरू होईल, असे काकाणी यांनी सांगितले़शिर्डी विमानतळावर विमान पार्किंगची क्षमता चारवरून अकरापर्यंत वाढविण्यात येत आहे़ येथे इंधन भरण्याचीही सुविधा आहे. एप्रिलपासून मुंबईत विमान उतरवणे शक्य नसेल तेव्हा तेथील विमाने शिर्डीत वळविण्यात येतील़ सध्या ही विमाने अहमदाबाद येथे नेण्यात येतात़ आंतरराष्ट्रीय सुविधा निर्माण करेपर्यंत सध्याही पंधरा दिवस आगाऊ परवानगी काढून विदेशातून येणारी खासगी विमाने येथे उतरु शकतील़, असेही काकाणी यांनी म्हणाले.>रोज चाळीस विमानांचे उड्डाण होणारसध्या देशांतर्गत सेवा वाढवण्यावर भर आहे. दोन वर्षापूर्वी चार विमानाने सुरू झालेल्या या विमानतळावर आता रोज अठ्ठावीस उड्डाणे होत आहेत़ येत्या दोन महिन्यांत ही संख्या चाळीसपर्यंत नेण्याचा प्रयत्न आहे़ यात शिर्डी-तिरुपती देवस्थानांना जोडणाऱ्या सेवेचाही समावेश असेल़ दोन वर्षांत पाच लाख प्रवाशांनी शिर्डी विमानसेवेचा लाभ घेतला़ या वर्षात हा आकडा सात लाखांवर नेण्याचा मानस आहे. पुढील वर्षी हा आकडा चौदा लाखांवर नेण्याचा कंपनीचा संकल्प असल्याचे काकाणी यांनी सांगितले़