शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा बदली यापुढे बंद, शासन निर्णयाला शिक्षक संघटनांचा विरोध

By चंद्रकांत शेळके | Updated: June 28, 2023 16:18 IST

शासनाने निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी होत आहे.

चंद्रकांत शेळके, अहमदनगर : यापुढे भरती होणाऱ्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली होणार नाही. आंतरजिल्हा बदली करू इच्छिणाऱ्या शिक्षकांना थेट राजीनामाच द्यावा लागेल व जेथे बदली हवी तेेथे पुन्हा परीक्षा देऊन गुणवत्तेच्या आधारे नियुक्ती मिळवावी, असा निर्णय मागील आठवड्यात शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयाचा शिक्षक संघटनांमधून जोरदार विरोध होत असून शासनाने निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी होत आहे.

शालेय शिक्षण विभागाने २१ जून रोजी शासन आदेश काढून त्यात नव्याने काही शिक्षकांची भरती करण्याचे नियोजन केले आहे. तसेच शिक्षकांच्या बदलीबाबत सुधारित धोरण घेतले आहे. त्यानुसार नवीन भरती झालेल्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली होणार नाही. यामुळे एका जिल्ह्यात नियुक्ती झालेले शिक्षक पुढे दुसऱ्या जिल्ह्यात बदली करू शकणार नाही. बदली करण्यासाठी नोकरी सोडावी लागेल व पाहिजे त्या जिल्ह्यात नियुक्तीसाठी पुन्हा अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा द्यावी लागेल. केवळ अपवादात्मक स्थितीतच बदली होणार आहे. यामुळे शिक्षकांसह संघटनाही संतापल्या आहेत.

बदली हा प्रत्येक कर्मचाऱ्याचा अधिकार असतो. बदली बंद करून शासन शिक्षकांवर अन्याय करू शकत नाहीत. शिक्षकांच्या बदल्या करताना होणारा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी २०१७ मध्ये राज्याचे तत्कालिन ग्रामविकास मंत्री आणि ग्रामविकास सचिव यांनी शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन केली होती. या निर्णयामुळे शिक्षकांच्या बदल्या सुरळीत झाल्या, शिवाय भ्रष्टाचार थांबला. आता बदलीसाठी ज्या अटी टाकल्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी पुन्हा भ्रष्टाचार होऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.जिल्हांतर्गत बदलीचे धोरण ठरवावे

शिक्षण विभागाने ग्रामविकास विभागालाही आपल्या धोरणात या अनुषंगाने बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हांतर्गत आपसी बदली, वैद्यकीय कारणास्तव तसेच तक्रारीच्या अनुषंगाने वा पती-पत्नी एकत्रिकरणांतर्गत अपवादात्मक प्रकरणांतील बदलीबाबत ग्रामविकास विभागाने धोरण ठरवावे, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे.त्या शिक्षकांना एक संधी

दरम्यान, जुन्या शिक्षकांपैकी इच्छुक शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीची एक संधी दिली जाईल. ज्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची २०२२ मधील कार्यवाही पूर्ण झाली आहे, मात्र विनंती बदली मिळालेली नाही, अशा शिक्षकांची प्रतीक्षा यादी तयार करून पदे रिक्त होतील, त्याप्रमाणे नियुक्ती दिली जाणार आहे.बदल्या नको ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे. शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा. आंतरजिल्हा बदल्या करताना जिल्ह्याचे नव्हे तर राज्याचे रोष्टर एक करावे. म्हणजे जुन्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेला गती येईल. - बापूसाहेब तांबे, शिक्षक नेते, गुरुमाऊली मंडळपरजिल्ह्यात सेवा करणाऱ्या शिक्षकांची बदलीच न करणे हे धोरण अत्यंत चुकीचे आहे. कारण वर्षानुवर्षे काही शिक्षक स्वतःच्या कुटुंबापासून दूर सेवा देतात. त्यांना न्याय मिळायला हवा. वघड व पेसा क्षेत्रातील बदल्यांबाबत धोरण ठरविणे गरजेचे आहे. - प्रवीण ठुबे, शिक्षक नेते, प्राथमिक शिक्षक परिषद

टॅग्स :Teacherशिक्षक