श्रीगोंदा : जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष तसेच पंचायत समिती सभापती-उपसभापतीपदाच्या निवडणुकीत एकत्र राहा, सत्ता विकेंद्रीकरण करा. त्यानंतर आपण एकमताने विधानसभेचा उमेदवार ठरवू. घाई करू नका, असा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी श्रीगोंद्यातील आघाडीच्या नेत्यांना दिला आहे.काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे, कुंडलिकराव जगताप, घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार, प्रा.तुकाराम दरेकर, राहुल जगताप व राजेंद्र नागवडे यांनी मुंबईत शरद पवार यांची भेट घेतली. सुरुवातीला सध्याची राजकीय परिस्थितीबद्दल माहिती घेत असताना पवारांनी पेपरची कात्रणे नजरेखालून घातली. पवार म्हणाले, पाचपुते या निवडणुकीत बरेच काही करणार आहेत. त्यांच्याविरोधात कोणते ब्रह्मास्त्र वापरायचे, निवडणुकीत कोणते कोणते मुद्दे मांडायचे याचा अभ्यास केला आहे, तुम्ही फक्त सबुरीने घ्या. पक्का बंदोबस्त करावयाचा आहे.(तालुका प्रतिनिधी)
इरादा पक्का, पाचपुतेंना धक्का
By admin | Updated: December 13, 2023 11:59 IST