शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी
3
"माझ्यापेक्षा मोठा गुंड नाही"; भाजपाच्या आजी-माजी खासदारांमध्येच जुंपली, एकमेकांना भिडले अन्...
4
Zohrab Mamdani: न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
5
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये समन्वय साधून अंतिम निर्णय”: सुनील तटकरे
6
'जप्त केलेल्या मालमत्ता आणि थकीत कर्जाची माहिती द्या,' विजय माल्ल्यानं न्यायालयात काय म्हटलं?
7
Astrology: नशिबात नसलेल्या गोष्टीही स्वामीकृपेने मिळवता येतात का? ज्योतिष शास्त्र काय सांगते? पाहू
8
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
11
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
12
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
13
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
14
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
15
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
16
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
17
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
18
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
19
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
20
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी

सीआयडी घेईना निरीक्षकाच्या आवाजाचा नमुना : पाथर्डी प्रकरणाचा तपास रखडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 17:42 IST

थेट विधिमंडळात प्रश्न उपस्थित झालेल्या पाथर्डी येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांवरील गुन्ह्यांचा वर्षभरापासून तपास रखडला आहे़

अहमदनगर : थेट विधिमंडळात प्रश्न उपस्थित झालेल्या पाथर्डी येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांवरील गुन्ह्यांचा वर्षभरापासून तपास रखडला आहे़ या गुन्ह्यात महत्त्वाचाचा पुरावा ठरणाऱ्या पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्या आवाजाचा नमुना अद्यापपर्यंत सीआयडीने घेतलेला नसल्याचे समोर आले आहे़ तपासाला गती मिळावी यासाठी गृहराज्यमंत्री यांनी या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे दिला होता़ प्रत्यक्षात मात्र तपासात काहीच प्रगती नसल्याने हा विधिमंडळाचा अवमान ठरला आहे़पाथर्डी येथील पत्रकार हरिहर गर्जे व सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांच्याविरोधात खोटा गुन्हा दाखल झाल्याचे समोर आले होते़ याबाबत पत्रकार संघटनांनी जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांची भेट घेऊन गर्जे यांच्यावर व्यक्तीद्वेषातून खोटा गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे निवेदन दिले होते़ अधीक्षकांनी हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला़ त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते किसन आव्हाड यांच्याविरोधात ११ जानेवारी रोजी मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला़ यामध्ये किसन आव्हाड व विजय आव्हाड यांनी एकमेकांविरोधात परस्परविरोधी फिर्याद दाखल केली़दरम्यान पाथर्डी पोलीस ठाण्याचे तत्कालिन पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण व विजय आव्हाड यांच्यात मोबाईल फोनवरून झालेल्या संभाषणाची एक आॅडिओ क्लिप १४ फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर व्हायरल झाली़ या क्लिपमधील संवादातून कशा पद्धतीने खोटा गुन्हा दाखल करण्यात आला़ यांचे संभाषण आहे़ ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर खोट्या गुन्ह्यात पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना अडकविले जात असल्याने जिल्हाभरातून सामाजिक संघटनांनी आंदोलन केले होते़ याप्रकरणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे यांनी विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता़यावेळी गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी गर्जे, आव्हाड यांच्यावरील गुन्हे व व्हायरल क्लिपबाबत सीआयडीकडे तपास देण्याचे तसेच खोटे गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते़ गृहराज्यमंत्र्यांच्या आदेशानुसार हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग झाले़ गुन्हा वर्ग होऊन खूप दिवस होऊन गेले आहे़ या गुन्ह्याच्या तपासात मात्र काहीच प्रगती होईना़सीआयडीने अडीच महिने काय केले?च्पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी त्यांना बोलविण्यात येणार आहे़, अशी प्रतिक्रिया सीआयडीचे उपाधीक्षक के़पी़ यादव यांनी लोकमतच्या गत २८ नोव्हेंबरच्या वृत्तात दिली होती़ दोन महिने उलटून गेल्यानंतर तपासातील प्रगती जाणून घेतली असता ‘चव्हाण यांच्या आवाजाचे नमुने घेण्यासाठी आम्ही वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेणार आहोत’ असे उत्तर यादव यांनी लोकमतला दिले़ त्यामुळे सीआयडीने गत अडीच महिने या प्रकरणाचा नेमका काय तपास केला? असा प्रश्न आता उपस्थित होतो़ सीआयडी तपास करण्यास टाळाटाळ करत आहे, असा अर्थ यातून निघू लागला आहे़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस