करोनाच्या प्रतिबंधासाठी कॉन्टॉक्ट ट्रेसिंग- २० पेक्षा जास्त असावी लागते. नगर जिल्हयातही २० जणांचीच तपासणी करण्याचा आदेश आहे. बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांची सध्या तपासणी केली जात नाही किंवा आरोग्य यंत्रणेकडून त्यांच्याशी संपर्कही साधला जात नाही. किंवा अशा लोकांना क्वारंटाईन करण्याची कोणतीही सुविधा सध्या जिल्ह्यात अस्तित्त्वात नाही. सध्या नगर जिल्हयात रोज सरासरी १५० जण पॉझिटिव्ह येत आहेत. यातील प्रत्येकाच्या संपर्कातील २० जणांची तपासणी झाली तर रोज तीन हजार जणांच्या चाचण्या होतील. त्यातील १० टक्के जरी पॉझिटिव्ह आले तरी ही संख्या ३०० पर्यंत वाढू शकते. सध्या ही संख्या १५० पर्यंतच असल्याने बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणीच होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
------------
कोरोनाचे सध्याचे रुग्ण
बरे झालेले रुग्ण
उपचार सुरू असलेले रुग्ण
एकूण मृत्यू
--------------
माझ्या मुलाची तपासणी केली असता तो पॉझिटिव्ह आला. तो एका शाळेत जातो. तपासणी करण्याआधी त्याच्या संपर्कातील आलेल्यांची तपासणी केली नाही. तसेच ज्या घरात राहतो. त्या परिसरातील लोकांचीही तपासणी किंवा सर्वे झाला नाही.
-एक पालक, अहमदनगर
---------------
मला अस्वस्थ वाटत होते. तसेच चवही लागत नव्हती. त्यामुळे तपासणी केली. चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र इतर लक्षणे नसल्याने घरीच उपचार घेत आहे. इतरांच्या संपर्कात आलोही असेल. मात्र अशांची चौकशी माझ्याकडेही झाली नाही किंवा माझ्या घराच्या परिसरातील कोणाचीही चौकशी अथवा तपासणी झाली नाही.
-एक नागरिक, अहमदनगर
-------------
बाधित रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करण्याबाबतचे काम सुरूच आहे. मात्र त्याला सध्या पाहिजे तेवढी गती नाही. याबाबत बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या वाढविण्याच्या दृष्टिने नियोजन सुरू आहे. तसेच संबंधित यंत्रणांना कार्यवाहीचे आदेशही दिलेले आहेत.
-डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा शल्य चिकित्सक
--------------
(डमी)