शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण भारताचा जुना मित्र, दुसरीकडे इस्त्रायल..."; मध्य पूर्वेतील युद्धावर सोनिया गांधी स्पष्ट बोलल्या
2
Air India :'या' तीन कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करा'; अहमदाबाद विमान अपघातानंतर एअर इंडियाला डीजीसीएचे आदेश
3
हास्यास्पद! पाऊस पडतोय म्हणून नाही आणले...; एअर इंडियाची दोन विमाने लगेज न घेताच आली
4
"संपूर्ण युक्रेन आमचा..."; पुतिन यांनी झेलेन्स्की यांच्या संपूर्ण देशावरच ठोकला दावा! मिळालं असं उत्तर
5
ऑफिसला न जाताच कर्मचाऱ्याला मिळाले २६ लाख रुपये; कोर्टाने दिला मोठा निर्णय
6
"गोयंकाजी पाहताय ना?’’, इंग्लंडमध्ये पंतच्या फटकेबाजीनंतर फॅन्सनी घेतली लखनौच्या मालकांची शाळा  
7
हनीमुनचा प्लॅन, रसगुल्लामध्ये विष भरले अन्...; बेवफा सोनमपेक्षाही खतरनाक आहे खूनी 'मुस्कान'
8
NSE चा IPO कधी येणार? सेबीचे अध्यक्ष म्हणाले, "आयपीओ आणण्यात कोणताही अडथळा..."
9
Air India Plane Crash: "१४ वर्षांनी घरी लक्ष्मी जन्मली अन् विमान दुर्घटनेत दुर्दैवाने तिलाच गमावले..."
10
गळफास लावलेल्या स्थितीत सापडला भाजपा नेत्याचा मृतदेह, दोरीने बांधलेले होते दोन्ही हात, संशयास्पद मृत्युमुळे खळबळ
11
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
12
८ वर्षांपूर्वी आई गेली, नुकतेच बाबाही गेले; रीमा लागूंच्या वाढदिवसानिमित्त लेकीची भावुक पोस्ट
13
"मी शांततेसाठी कितीही प्रयत्न केले तरी...!"; काँगो-रवांडा शांतता करारानंतर ट्रम्प यांचं दुःख, बोलून दाखवली नोबेल पुरस्काराची इच्छा
14
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
15
पाकिस्तानमध्ये चार हिंदू भावंडांचे अपहरण, जबरदस्तीने धर्म बदलण्यास भाग पाडले; आईकडून न्यायाची मागणी
16
Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!
17
अहमदाबादमधील विमान अपघातात वाचलेल्या विश्वासला अभिनेत्रीनं म्हटलं 'खोटारडा', ट्रोल झाल्यावर घेतला युटर्न
18
कर्मचाऱ्याला सॅलरीतून मिळाले १४ कोटी तर झाला अवाक्; नंतर जे काही झालं त्याचा विचारही केला नसेल
19
R Madhavan घरबसल्या कमावणार महिन्याला ६.५ लाख रुपये; भाड्यानं दिला १७.५ कोटींचा फ्लॅट, एकूण किती कमाई करणार?
20
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 

अंतर्गत वादाने नगरचे ‘आप’ अस्वस्थ

By admin | Updated: June 9, 2014 00:04 IST

अहमदनगर: सर्वसामान्यांना सत्तेची स्वप्नं दाखविणाऱ्या आम आदमी पक्षाचा फुगा लोकसभा निवडणुकीत फुटला़ निवडणुकीनंतर प्रमुख नेत्यांत चांगली जुंपली.

अहमदनगर: सर्वसामान्यांना सत्तेची स्वप्नं दाखविणाऱ्या आम आदमी पक्षाचा फुगा लोकसभा निवडणुकीत फुटला़ निवडणुकीनंतर प्रमुख नेत्यांत चांगली जुंपली असून, ऐन विधानसभेच्या तोंडावर कार्यकर्त्यांमध्ये यामुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे़ त्यामुळे पक्षाचे संघटन तर दूरच पण नगर शहरासह जिल्ह्यातून पक्ष बेदखल होतो की काय, या चिंतेने कार्यकर्त्यांना ग्रासले आहे़सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून आम आदमी पक्ष समोर आला़ दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाने प्रस्थापितांचा सफाया केला़ सर्वसामान्यांनी आपला आपले मानले आणि त्यांच्या झोळीत भरभरून मते टाकली़ आपने दिल्ली सर केली़ या विजयाने आपचे नेते हुरुळून गेले़ त्यांना लोकसभेचे डोहाळे लागले़ दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर पाणी सोडून अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उडी घेतली़ परंतु दिल्लीत मिळविलेला विश्वास आपने लोकसभेच्या निवडणुकीत गमावला़ काही मतदारसंघात तर आपच्या नेत्यांना दगड झेलावे लागले़ निवडणुकीनंतर पक्ष सावरेल, अशी अपेक्षा होती़ मात्र पुन्हा पक्षात राजीनामा नाट्य सुरू झाले़ त्यामुळे पक्षाचे हासू झाले़ कुणाचाच पायपोस कुणात राहिला नाही़ अशीच काही स्थिती नगरमध्येही पहायला मिळत आहे़ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापले असतानाच आप मध्ये मात्र थंडाथंडा कुल कुल, असे वातावरण आहे़ कार्यकर्ते कोण आणि कुठे आहे,याचा थांग पत्ता नाही़लोकसभा निवडणुकीत आपकडे युवक कार्यकर्त्यांची संख्या मोठी होती़ परंतु दोन्ही मतदारसंघातील उमेदवारांचा पराभव झाला़ त्यामुळे जिल्ह्यात पक्षाला भविष्य नाही,असे कार्यकर्त्यांचे मत झाले आहे़ त्यात वरिष्ठ पातळीवर गोंधळाचे वातावरण आहे़ त्यामुळे नवीन कार्यकर्ते जोडले जातील, असे वाटत नाही़ पक्ष संघटना बळकट करून दिग्गजांना आव्हान देऊ शकेल,असा चेहरा नाही़ पक्ष स्थापनेपासून असा एकही कार्यकर्ता पक्षाच्या गळाला लागला नाही़ याशिवाय पक्षाची इतर राजकीय नेत्यांनी दखल घ्यावी, असे काही घडताना दिसत नाही़ विधानसभा निवडणुकीत हे चित्र पालटेल, असा विश्वास पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांना आहे़ परंतु प्रत्यक्षात त्यासाठी प्रयत्न होत नसून, पक्षापासून कार्यकर्तेही दुरावत चालले आहेत़ त्यामुळे विधानसभा निवडणुकीत आप कुठे असेल, याबाबत उत्सुकता आहे़ (प्रतिनिधी)पक्षात सर्वकाही ठिक आहे़ कार्यकर्तेही काम करत आहेत़ विधानसभा निवडणुकीबाबत पुढील महिन्यात निर्णय होणार आहे़ त्यानुसार निवडणूक लढविली जाणार असून, उमेदवारही निश्चित होतील़- किरण उपकरे, आप