शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नगरमधील टँकर घोटाळा प्रकरणी चौकशीचे आदेश, ‘लोकमत’ने केले हाेते ‘स्टिंग ऑपरेशन’

By सुधीर लंके | Updated: December 11, 2020 07:02 IST

नगर जिल्ह्यातील टँकर घोटाळ्याची अखेर शासनाने गंभीर दखल घेतली असून गत पाच वर्षांत झालेल्या अनियमिततेची एक महिन्याच्या मुदतीत चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे.

-  सुधीर लंकेअहमदनगर : नगर जिल्ह्यातील टँकर घोटाळ्याची अखेर शासनाने गंभीर दखल घेतली असून गत पाच वर्षांत झालेल्या अनियमिततेची एक महिन्याच्या मुदतीत चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. नगरच्या अधिकाऱ्यांऐवजी नाशिक जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडे ही चौकशी सोपविण्यात आल्याने टँकर ठेकेदार व अधिकाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत. २०१९ या वर्षात जिल्ह्यातील टँकर पुरवठ्यावर तब्बल १०१ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र, ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग ऑपरेशन’मध्ये अनेक टॅँकर गावात जात नाहीत, जीपीएस यंत्रणा बंधनकारक असतानाही टँकरला जीपीएस बसविलेले नाहीत, अशा बाबी निदर्शनास आल्या होत्या. बहुतांश ठेकेदारांनी जीपीएसचे खरे अहवाल देण्याऐवजी संगणकावर बनावट अहवाल तयार करून बिले सादर केली. या सर्व प्रकाराकडे नगर जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. यासंदर्भात जिल्हा परिषदेने एक चौकशीही केली. मात्र, त्यातही जीपीएस अहवालांकडे दुर्लक्ष करण्यात आले. जामखेड तालुका वीट उत्पादकांची मोटार वाहतूक सहकारी संस्था यांनी तर अनुभवाची दिशाभूल करणारी कागदपत्रे सादर करून २०१३ व २०१५ या वर्षांचा ठेका मिळविल्याची तक्रार आहे.रोहित पवारांची तक्रार नगर जिल्ह्यातील टँकर घोटाळ्याबाबत आ. रोहित पवार यांनीही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे तक्रार केलेली आहे. टँकरच्या दरांमध्ये २०१२नंतर वाढ झालेली नव्हती.  मात्र, भाजप सरकारच्या काळात २०१८मध्ये नगर जिल्ह्यातील काही ठेकेदारांनी मंत्र्यांशी संपर्क करत तब्बल ७० टक्क्यांनी टँकरचे दर वाढवून घेतले आहेत.  हे दर झटपट कसे वाढले? ही बाब संशयास्पद आहे.  या वाढीव दराने जुन्याच निविदा मंजूर करण्याचा प्रकारही जिल्ह्यात घडला आहे.

टॅग्स :Waterपाणीwater transportजलवाहतूकAhmednagarअहमदनगर