शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्हा बँकेच्या नोकरभरतीची चौकशी सुरू; ६ नोव्हेंबरपर्यंत पुरावे सादर करण्याची मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 19:24 IST

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वादग्रस्त ठरलेल्या नोकरभरतीबाबत बुधवारपासून चौकशी सुरू झाली आहे. या नोकरभरतीबाबत ‘लोकमत’ने सुरुवातीपासून ...

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वादग्रस्त ठरलेल्या नोकरभरतीबाबत बुधवारपासून चौकशी सुरू झाली आहे.या नोकरभरतीबाबत ‘लोकमत’ने सुरुवातीपासून सातत्याने आवाज उठवित पाठपुरावा केला होता. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांचा मुलगा परीक्षार्थी असतानाच वर्पे निवड समितीचे सदस्य म्हणून काम पाहत होते. याबाबतच्या वृत्ताची सहकार खात्याचे मंत्री सुभाष देशमुख, सहकार आयुक्त विकासकुमार झाडे यांनी तत्काळ गंभीर दखल घेतली. त्यानंतर त्यांनी याबाबत नाशिक येथील विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांना चौकशीचे आदेश दिले होते. भालेराव यांनी तत्काळ बँकेस पत्र देऊन नोकरभरतीची नियुक्ती प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत तातडीने थांबविण्याचे आदेश दिले. तसेच अहमदनगरच्या उपनिबंधकांना याबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला. त्यानुसार नगर तालुक्याचे सहायक निबंधक राम कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बुधवारपासून नोकरभरतीबाबत चौकशी करण्यास सुरूवात केली. या पथकाने जिल्हा बँकेत जाऊन बँकेच्या अधिका-यांकडून नोकरभरती प्रक्रियेची माहिती घेतली. मागितलेली माहिती व आवश्यक कागदपत्रे बँकेच्या अधिका-यांनी या पथकाच्या अधिका-यांना उपलब्ध करून दिली.या भरती प्रक्रियेबाबत कोणाच्या काही तक्रारी, हरकती किंवा आक्षेप असल्यास त्यांनी ६ नोव्हेंबरच्या दुपारी ३ वाजेपर्यंत लेखी स्वरुपात कागदपत्रांच्या पुराव्यांसह आपल्या तक्रारी, आक्षेप जिल्हा उपनिबंधक कार्यालय, जिल्हा बँक, तिसरा मजला, अहमदनगर येथे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत सादर करण्याचे आवाहन चौकशी अधिकारी तथा सहायक निबंधक आर. बी. कुलकर्णी यांनी केले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरbankबँक