केडगाव : लॉकडाऊन लागले आणि दिवसभर काबाडकष्ट करून दोनवेळेचा पोटाचा प्रश्न सोडविणाऱ्या गोरगरिबांचे अर्थचक्र थांबले. पोटाची खळगी कशी भरायची, या विवंचनेत रोज लॉकडाऊन उघडण्याची वाट पाहणाऱ्या पालांवर अनपेक्षितपणे मदत पोहोच होताच तेथील निरागस चेहरे खुलले.
पालांमध्ये राहून आज इकडे तर उद्या तिकडे, अशी भटकंती करणाऱ्या कुटुंबांसमोर सध्या दोनवेळच्या जेवणाची भ्रांत आहे. केडगाव बायपासला अशीच भटकंती करणारे काही वंचित पाले टाकून उद्याच्या सुखमय दिवसाची वाट पाहत आहेत. बॉस्को ग्रामीण विकास केंद्र व सीएसआर पार्टनर ट्रेसलिंक प्रायव्हेट लिमिटेड या संस्थेच्या निदर्शनास ही बाब आली. या वंचितांसाठी काहीतरी करावे म्हणून या दोन्ही संस्थांच्या पुढाकारातून जवळपास ९० जणांना भोजन देण्यात आले. त्यानंतर, पालावरच्या निरागसांचे चेहरे खुलले. या लोकांना या दोन्ही संस्थांच्या वतीने यापूर्वी किराणा मालाचीही मदत करण्यात आली. ते येथे आहेत तोपर्यंत त्यांना या दोन्ही संस्था मदत करणार आहेत.
बॉस्को ग्रामीण संस्थेने पुढाकार घेत कोविड सेंटर सुरू केले. यातून पावणेचारशे रुग्ण बरे होऊन घरी गेले. तसेच स्थलांतरित मजूर, कामगार व त्यांच्या कुटुंबांना राहण्याची व जेवणाची व्यवस्था या संस्थेच्या वतीने करण्यात आली होती. बॉस्को ग्रामीण केंद्राचे संचालक फादर जॉर्ज डिआब्रिओ, उपसंचालक फादर नेल्सन मुदलियार यांच्या पुढाकारातून लॉनडाऊनमुळे स्थलांतरित झालेल्या गोरगरीब कुटुंबांना आधार देण्याचा उपक्रम मागील वर्षीपासून सुरू आहे.
--
प्रत्येकाला समाजाचे काहीतरी देणे आहे. खरेतर, हीच वेळ आहे गोरगरीब व वंचित कुटुंबांना मदत करण्याची. या समाजाला आपली गरज आहे, या भावनेतून आम्ही लॉकडाऊनमध्ये मागील वर्षापासून काम करीत आहोत.
-जॉर्ज डिआब्रिओ,
संचालक, बॉस्को ग्रामीण विकास केंद्र, केडगाव
---
०४ केडगाव बॉस्को
केडगाव बायपासजवळील वंचित घटकांच्या वस्तीवर मुलांना फूड पॅकेटवाटप करण्यात आले.
020621\57414020img-20210601-wa0328.jpg~020621\57414020img-20210601-wa0332.jpg
????? ???~पालावर मदत