शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिनियुक्त्यांमुळे प्रशासकीय बदल्यांत कर्मचा-यांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 11:55 IST

जिल्हा परिषदेत अनेक कर्मचाऱ्यांची नियुक्ती ज्या पदावर आहे त्याऐवजी ते सोयीने दुस-या तालुक्यात अथवा विभागात काम करतात.

अहमदनगर : जिल्हा परिषदेत अनेक कर्मचाऱ्यांची नियुक्ती ज्या पदावर आहे त्याऐवजी ते सोयीने दुस-या तालुक्यात अथवा विभागात काम करतात. बदल्यांच्या प्रक्रियेत मात्र प्रतिनियुक्तीवरील हे कर्मचारी मूळ जागेवरच हजर दाखविले जातात. तालुक्यांच्या जागांचे समानीकरण करतानाही त्यांचे मूळ पद भरलेले दाखविले जाते. त्यामुळे इतर कर्मचा-यांवर समानीकरणात बदल्यांची कु-हाड कोसळते.जिल्हा परिषदेत प्रतिनियुक्तीवर काम करण्याचे मोठे पेव फुटलेले आहे. प्रशासकीय बदल्यांमुळे अनेक कर्मचा-यांची गैरसोय होते. ज्यांचा कोठेच वशिला नाही असे प्रामाणिक कर्मचारी बदलीच्या ठिकाणी हजर होतात. जिल्हा परिषदेतील काही कर्मचारी मात्र त्यांना कोठेही नियुक्ती मिळाली तरी सेवावर्गाने विशिष्ट तालुक्यातच काम करताना दिसतात. अधिका-यांच्या मर्जीतून हा प्रकार घडतो. अधिकारी ‘अर्थपूर्ण’ संबंधातून या कर्मचा-यांची पाठराखण करतात.वित्त विभाग, बांधकाम विभागातील ठेकेदारांशी संबंधित काही मोक्याच्या जागा अशा कर्मचा-यांनी बळकावलेल्या आहेत. महिला बालकल्याण, सामान्य प्रशासन, कृषी, शिक्षण अशा सर्वच विभागात अनेक कर्मचारी प्रतिनियुक्तीवर आहेत. कामात गुणवत्ता रहावी, कर्मचाºयांचे विशिष्ट ठिकाणी ‘अर्थपूर्ण’ संबंध निर्माण होऊ नयेत, सर्व कर्मचाºयांना सर्व ठिकाणी काम करण्याची संधी मिळावी यासाठी प्रशासकीय बदल्या केल्या जातात. बदल्यांच्या या तत्वालाच प्रतिनियुक्त्यांमुळे हरताळ फासला जात आहे. प्रशासन याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे.कर्मचा-यांची गुणवत्ता कशी ओळखणार ?प्रतिनियुक्तीसाठी त्या विषयातील तज्ज्ञ कर्मचारी लागतात, अशी सबब अधिकारी व पदाधिकारी पुढे करतात. कोणता कर्मचारी त्या विषयात तज्ज्ञ आहे हे कसे ठरविले जाते? त्यासाठी काही परीक्षा अथवा मुलाखत घेतली जाते का? असा प्रश्न आहे. प्रतिनियुक्तीवरच कर्मचारी नियुक्त करावयाचे असतील तर जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर ती पदे नमूद करुन सर्व कर्मचा-यांना अर्ज सादर करण्याची संधी द्या, असा पर्याय काही कर्मचा-यांनी सूचविला आहे. त्यात पारदर्शीपणा राहील व सर्वांना संधीही मिळेल.बदल्यांमध्ये इतरांवर अन्यायप्रतिनियुक्तीवर काम करत असलेल्या कर्मचा-याचे मूळ पद बदल्यांत रिक्त दाखविले जात नाही. उदा. नगर तालुक्यात एखाद्या विभागात पाच कर्मचारी कार्यरत आहेत. प्रत्यक्षात त्यातील दोन कर्मचारी प्रतिनियुक्तीवर दुसरीकडे काम करतात. याचा अर्थ या तालुक्यात तीनच कर्मचारी आहेत. मात्र ही बाब विचारात न घेता सर्व पदे भरलेली दाखविल्यामुळे सपाटीकरणात या तालुक्यात इतर कर्मचा-यांवर बदलीची कु-हाड कोसळते.प्रतिनियुक्त्या रद्द होणार का?प्रतिनियुक्त्यांच्या बदल्यांना काहीच निकष नसून ‘वशिला’ किंवा ‘आर्थिक देवघेव’ हे दोनच निकष बहुतांश पदांसाठी असल्याचे कर्मचारी खासगीत सांगतात. दहा-पंधरा वर्षे हे कर्मचारी एकाच ठिकाणी व तालुक्यांत ठाण मांडून आहेत. हा एकप्रकारचा घोटाळा असून या कर्मचा-यांचाही ‘विशेष संवर्ग’ तयार झाला आहे. त्यांची केवळ कागदावर बदली होत राहते. सामान्य प्रशासन विभागाने याबाबत हरकत घ्यायला हवी व मुख्य कार्यकारी अधिका-यांचे लक्ष वेधायला हवे. मात्र, हा विभाग डोळ्यावर पट्टी बांधून बसलेला आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद