शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

नगर, पुणे, मुंबईसह इतर जिल्ह्यांमध्ये मोस्ट वाँटेड असलेला कुख्यात गुंड चन्या बेगला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 14:06 IST

चन्यावर श्रीरामपूर, शिर्डी, कोपरगाव, नाशिक, पुणे, मुंबई अशा विविध पोलीस ठाण्यांत खून, दरोडा, खंडणी, सोनसाखळीच्या चो-या असे एकूण १४ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सर्वच पोलीस त्याच्या मागावर होते. गेल्या आठ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत त्याची गुन्हेगारी सुरूच होती.

ठळक मुद्देश्रीरामपूर, शिर्डी, कोपरगाव, नाशिक, पुणे, मुंबई अशा विविध पोलीस ठाण्यांत चन्या बेगवर खून, दरोडा, खंडणीचे १४ गुन्हे नगर, मुंबई पोलिसांनी लावला होता मोक्का

अहमदनगर : श्रीरामपूर, शिर्डी, नाशिक, पुणे, मुंबई तसेच इतर जिल्ह्यात खून, दरोडा, खंडणी व मोक्कांतर्गत गुन्हे दाखल असलेला कुख्यात गुन्हेगार चन्या बेगसह तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी दुपारी जेरबंद केले.चन्या ऊर्फ सागर अशोक बेग व त्याच्या साथीदारांची श्रीरामपुरात मोठी दहशत आहे. चन्यावर श्रीरामपूर, शिर्डी, कोपरगाव, नाशिक, पुणे, मुंबई अशा विविध पोलीस ठाण्यांत खून, दरोडा, खंडणी, सोनसाखळीच्या चो-या असे एकूण १४ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे सर्वच पोलीस त्याच्या मागावर होते. गेल्या आठ वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देत त्याची गुन्हेगारी सुरूच होती. खब-याच्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने चन्या बेग व त्याच्या टोळीचा छडा लावला. शुक्रवारी (दि. १३) चन्या व त्याचे साथीदार नगरमध्ये येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह पथकाने शुक्रवारी दुपारी नगर-दौंड रस्त्यावर अरणगाव येथे सापळा लावला. दुपारी एकच्या सुमारास चन्या बेगच्या कारचा वेग अरणगाव येथे गतिरोधकावर मंदावला़ त्याचवेळी पोलिसांनी त्याला झडप घालून पकडले़ या कारमधील चन्या बेग, आकाश ऊर्फ टिप्या अशोक बेग, सागर साहेबराव शिंदे (सर्व रा. श्रीरामपूर) असे तिघेजण पोलिसांच्या हाती लागले़ त्याचवेळी त्याच्या इतर साथीदारांची एक कार मागून येत होती, परंतु पोलिसांना पाहून धूम ठोकली. पळून गेलेल्या आरोपींत अर्र्जुन खुशाल दाभाडे, लखन प्रकाश माखिजा, सागर काशीनाथ शेटे, रितेश आसाराम काटे, सुधीर काळोखे यांचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.पोलिसांनी चन्या बेगसह आरोपींकडून स्कोडा कंपनीची कार (एमएच १२-एचएल ७९२६), एक गावठी कट्टा व एक जीवंत काडतूस, तसेच वेगवेगळ्या कंपनीचे १३ मोबाईल फोन असा ८ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. हे आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर नगर व मुंबई पोलिसांकडून मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.

आरोपींच्या कारवर पोलिसांचा लोगो

चन्या बेगची जी स्कोडा कार पोलिसांनी पकडली त्यावर पोलिसांचा लोगो लावलेला होता. त्यामुळे त्याची गाडी सहसा कोणी अडवत नव्हते. पोलिसांचा लोगो असल्याने हे गुन्हेगार राज्यभर मोठ्या सहजतेने वावरत होते. याशिवाय यातील दुसरा आरोपी टिप्या उर्फ आकाश बेग याच्याकडे सापडलेल्या वाहन परवान्यावर छायाचित्र त्याचे मात्र नाव दुस-याचेच होते.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर