शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

१ हजार ३६१ ग्रामपंचायत सदस्य होणार अपात्र : जात प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 12:22 IST

जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांचे पद रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फटका नगर जिल्ह्यातील तब्बल १ हजार ३६१ ग्रामपंचायत सदस्यांना बसला आहे. ग्रामीण भागात यामुळे मोठी खळबळ उडाली असून रिक्त होणाºया जागांवर पुन्हा निवडणूक घ्यावी लागणार आहे.

अहमदनगर : जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांचे पद रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा फटका नगर जिल्ह्यातील तब्बल १ हजार ३६१ ग्रामपंचायत सदस्यांना बसला आहे. ग्रामीण भागात यामुळे मोठी खळबळ उडाली असून रिक्त होणाºया जागांवर पुन्हा निवडणूक घ्यावी लागणार आहे.अहमदनगर जिल्ह्यात आॅगस्ट २०१५ मध्ये साडेसातशे ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. यात जिल्ह्यातील २ हजार १९१ सदस्यांनी आरक्षित जागेवर निवडणूक लढवली. या सदस्यांना पुढील सहा महिन्यांत जात वैधता प्रमाणपत्र देणे बंधनकारक होते. त्यातील ८३० जणांनी वेळेत प्रमाणपत्र सादर केले. उर्वरित १३६१ पैकी ५३३जणांकडे जात वैधता प्रमाणपत्रच नव्हते. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व अप्पर जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने रद्द झाले. बाकी ८२९ जणांकडे प्रमाणपत्र होते. परंतु त्यांनी ते सादर करण्यास उशीर केल्याने त्यांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी सुनावणी प्रक्रिया सुरू झाली.सदस्यत्व रद्द झालेल्या उमेदवारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयानेही या उमेदवारांचे अपील फेटाळल्याने त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयाने अप्पर जिल्हाधिका-यांच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे हे ५३३ सदस्य व ज्यांचा निर्णय प्रलंबित होता असे ८३९ अशा एकूण १३६१ जणांना मोठा दिलासा मिळाला व सदस्य म्हणून ग्रामपंचायतीत कार्यरत झाले होते. त्यावर आता पाणी फेरले आहे. दरम्यान, जात प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याच्या कारणावरून गुरूवारी सर्वोच्च न्यायालयाने कोल्हापूर महापालिकेच्या २० नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा निर्णय दिला. या निर्णयामुळे राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य अपात्र ठरले असून, त्यात नगर जिल्ह्यातील १हजार ३६१ ग्रा. पं. सदस्यांचा समावेश आहे.रिक्त जागांवर पोटनिवडणूकया निर्णयामुळे रिक्त होणाºया पदांचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला जाईल. त्यानंतर रिक्त जागांवर पोटनिवडणूक घेण्याचा कार्यक्रम आयोगाकडून दिला जाईल. याशिवाय २०१५ नंतर झालेल्या निवडणुकांतील ज्या सदस्यांनी वेळेत जात प्रमाणपत्र सादर केले नाही, अशा सदस्यांचीही माहिती मागवली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासन सूत्रांनी दिली.तालुकानिहाय अपात्र संख्यासंगमनेर.......... १९९नेवासा........... १६२नगर.............. १४९पारनेर........... १२५शेवगाव........ १०५पाथर्डी........... १२३कर्जत........... ९९श्रीगोंदा......... ९८अकोले......... ७६जामखेड........ ६३राहाता.......... ४८राहुरी........... ४५कोपरगाव...... ४०श्रीरामपूर........ २९

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय