शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
गोपीचंद पडळकर यांच्यासोबत वाद काय झाला? जितेंद्र आव्हाडांनी सगळंच सांगितलं
3
"मे-जून महिन्यात शेतकरी रिकामी, त्यामुळे वाढले खुनाचे गुन्हे", पोलीस अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान   
4
फहाद फासिलचा "१७ वर्षे जुना कीपॅड फोन" चर्चेत; किंमत ऐकून चक्रावून जाल...
5
"आम्ही भारताचे १०-२० जेट सहज पाडले असते, पण..."; बिलावल भुट्टो-ख्वाजा आसिफ यांचा हास्यास्पद दावा!
6
काय बुद्धी सुचली...! १ कोटी पगाराची नोकरी सोडली आणि सिक्युरिटी गार्ड बनला हा व्यक्ती, कशासाठी हा खटाटोप...
7
Video: 6.6.6.6.2.6...; राजस्थानच्या पठ्ठ्यानं मैदान गाजवलं, एकाच षटकात ठोकले ५ षटकार!
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
9
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
10
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
11
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
12
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
13
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
14
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
15
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
16
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
17
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
18
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
19
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
20
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  

'ठोस पुराव्याशिवाय इंदोरीकरांवर कारवाई नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 03:02 IST

जिल्हा शल्य चिकित्सकांचे स्पष्टीकरण; खुलाशात महाराजांनी फेटाळले आरोप

अहमदनगर : जिल्हा रूग्णालयाच्या पीसीपीएनडीटी समितीने इंदोरीकर यांच्याकडून मागवलेल्या खुलाशात त्यांनी आरोप फेटाळले आहेत. दुसरीकडे ज्या वृत्तपत्रात वादग्रस्त वक्तव्याबाबतची बातमी प्रथम प्रसिद्ध झाली. त्यांनाही नोटीस पाठवून पुरावे मागितले आहेत. म्हणजे जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाहीत, तोपर्यंत इंदोरीकर यांच्यावर कारवाई करता येणार नाही, असे जिल्हा शल्य चिकित्सक तथा पीसीपीएनडीटी समितीचे अध्यक्ष डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी गुरूवारी माध्यमांना सांगितले.

कीर्तनकार इंदोरीकर यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी गर्भलिंग निदानाबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने पीसीपीएनडीटी समितीने सात दिवसांपूर्वी त्यांच्याकडे खुलासा मागवला होता. इंदोरीकर यांनी वकिलांकरवी बुधवारी खुलासा जिल्हा रूग्णालयाकडे सादर केला. ‘मी असे कीर्तन केलेच नाही. जानेवारी आणि फेब्रुवारीत नगर जिल्ह्यात कोठेच कीर्तन झालेले नाही. उलट समाजप्रबोधन करत असल्याने महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी पुरस्कार देऊन सन्मान केला. आम्ही कोणत्याही कीर्तनाचा व्हीडिओ यू ट्यूबला दिलेला नाही. एवढेच काय कोणत्याही कीर्तनाची रेकॉर्डिंगही करत नाही’ असे इंदोरीकर यांनी खुलाशात म्हटल्याचे डॉ. मुरंबीकर म्हणाले. ज्या वर्तमानपत्रात प्रथम बातमी प्रसिद्ध झाली. त्यांनाही आपण नोटीस देऊन पुरावे मागितले आहेत. ते मिळाल्यानंतर छाननी करून पुढील दिशा ठरवता येईल, असे डॉ. मुरंबीकर यांनी सांगितले.‘लोकमत’चा अंदाज तंतोतंत खराइंदोरीकर यांनी बुधवारी जो खुलासा केला त्याबाबत जिल्हा रूग्णालयाने अत्यंत गुप्तता पाळली होती. रूग्णालय किंवा इंदोरीकरांचे वकील, सेवेकरी यांनी या खुलाशात नेमके काय म्हटले आहे, याबाबत काहीही सांगण्यास नकार दिला होता. परंतु ‘लोकमत’ला इंदोरीकरांच्या निकटवर्तीयांकडून खुलाशातील माहिती मिळाली होती. ती ‘लोकमत’ने बुधवारी प्रसिद्ध केली. गुरूवारी जेव्हा खुलासा समोर आला तेव्हा त्यातील मजकूर तंतोतंत बरोबर असल्याचे स्पष्ट झाले.

टॅग्स :indurikar maharajइंदुरीकर महाराजAhmednagarअहमदनगर