शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

वृद्धांसाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र विभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 12:56 IST

‘म्हातारपण आजारांचे ग्रहण’ असं म्हटलं जातं़ वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी मोठा खर्चही येतो़ त्यात वृद्धांना मेडिक्लेम पॉलिसीही नाकारल्या जातात़

साहेबराव नरसाळेअहमदनगर : ‘म्हातारपण आजारांचे ग्रहण’ असं म्हटलं जातं़ वेगवेगळ्या आजारांवर उपचार करण्यासाठी मोठा खर्चही येतो़ त्यात वृद्धांना मेडिक्लेम पॉलिसीही नाकारल्या जातात़ त्यामुळे अनेक वृद्धांना उपचार घेणेही दुरापास्त होते़ या वृद्धांना विनाकटकट व मोफत उपचार मिळावेत, यासाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र आयुष विभाग उभारण्यात आला असून, गुरुवारपासून त्याची अंमलबजावणी सुरु होणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ प्रदीप मुरंबीकर यांनी दिली़राष्ट्रीय आयुष मिशनअंतर्गत जिल्हा रुग्णालयात वृद्धांसाठी स्वतंत्र सेंटर उभारण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या होत्या़ त्यानुसार जिल्हा रुग्णालयात हे आयुष सेंटर सुरु करण्यात आले आहे़ जिल्हा रुग्णालयातील आयुष विभागात दर मंगळवारी सकाळी ९ ते दुपारी १२़३० वाजेपर्यंत वृद्धांना आरोग्य सुविधा पुरविण्यात येणार आहेत़ आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी व योग उपचार पद्धतीने वृद्धांना आरोग्य सेवा दिली जाणार आहे़ आयुर्वेदीय पद्धतीने वृद्धांची प्रकृती परीक्षण करुन त्यानुसार उपचार व आरोग्य सल्लाही दिला जाणार नाही़ वृद्धांमध्ये मधुमेहाचे प्रमाणही जास्त असते़ त्यामुळे मधुमेहावरील उपचार व त्यांना विशेष मार्गदर्शनही देण्यात येणार आहे़ वृद्धत्व काळात दुसरा एक महत्वाचा आजार म्हणजे सांधेदुखी़ या सांधेदुखी टाळण्यासाठी कोणत्या प्रकारचे व्यायाम करावेत, काय काळजी घ्यावी असे मार्गदर्शन करुन वृद्धांच्या सांधेदुखीवर उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ़ शौनक मिरीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़मानसिक रुग्णांना समुपदेशनवृद्ध व्यक्तींमध्ये मानसिक आजारांचे प्रमाणही दिवसेंदिवस वाढत आहे़ मानसिक प्रकृती खालावल्यामुळे अनेक औषधेही लागू पडत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे़ अशा मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या वृद्धांना मानसशास्त्रीय उपचार आणि समुपदेशन जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत़जिल्हा रुग्णालयात सर्जनची वाणवाजिल्हा रुग्णालयात विविध आजारांवर शस्त्रक्रिया करण्यासाठी रुग्ण येतात़ वृद्धांच्याही अनेक आजारांवर शस्त्रक्रियेची गरज असते़ मात्र, जिल्हा रुग्णालयात सर्जनची दोन्ही पदे रिक्त असल्यामुळे शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना सरळ बाहेरचा रस्ता धरावा लागतो़ त्याशिवाय वर्ग एकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची २८ पदे तर वर्ग दोनच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची ४ पदे रिक्त आहेत़ ही रिक्त पदे भरावीत, अशी मागणी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ मुरंबीकर यांनी शासनाकडे वारंवार केली आहे़ मात्र, ही पदे भरली जात नाहीत़

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर