शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
4
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
5
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
6
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
7
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
8
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
9
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
10
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
11
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
12
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
13
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
14
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
15
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
16
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
17
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
18
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
19
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
20
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
Daily Top 2Weekly Top 5

पुरेशा पावसाअभावी टँकरच्या संख्येत वाढ

By admin | Updated: July 10, 2014 00:35 IST

अहमदनगर: जिल्ह्यात पुरेसा पाऊस न पडल्यामुळे टँकरच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली असून,पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक टँकरची व्यवस्था करण्यात आली

अहमदनगर: जिल्ह्यात पुरेसा पाऊस न पडल्यामुळे टँकरच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली असून,पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे़पाऊस नसल्याने ग्रामीण भागातून टँकरच्या मागणीचा ओघ सुरू असल्याने टँकरच्या संख्येत आणखी वाढ होईल, असा अंदाज जिल्हा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे़जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले आहे़ मात्र पावसाला जोर नाही़ त्यात जून महिनाही पूर्णपणे कोरडा गेला़ त्यामुळे जिल्ह्यावरील पाणी टंचाईचे संकट कायम आहे़ खबरदारीचा उपाय म्हणून टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे़ जिल्हा प्रशासनाच्या टंचाई शाखेच्या अहवालानुसार, टँकरने पाणीपुरवठा सुरू असलेल्या गावांची संख्या २५० वरून २६४ वर पोहोचली आहे़ जुलैच्या पहिल्या आठवड्यात टँकरने पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या वाड्या वस्त्यांची संख्या १ हजार १५३ होती़ मात्र त्यात आता वाढ झाली असून, ही संख्या १ हजार २५० झाली आहे़ पाऊस न झाल्याने ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे़ सध्या जिल्ह्यात ३३७ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे़ दररोज किमान २० टँकरची भर पडत असून, वाड्या वस्त्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी खासगी टँकरचा आधार घेण्यात आला़जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा व भंडारदरा धरणाने तळ गाठला आहे़ धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव करण्यात आले आहे़ गेल्या दोन महिन्यांपासून आवर्तन सुटले नाही़ त्यामुळे लाभक्षेत्रात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे़ या परिसरातूनही टँकरची मागणी होऊ लागली आहे़ पाणी योजना नसलेल्या गावांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असून, त्यासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे़ टंचाईबाबत उपाय योजनांना थेट निधी देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत़ टँकरची मागणी केल्यास तातडीने टँकर उपलब्ध व्हावा, यासाठी तहसीलदारांना टँकरचे अधिकार देण्यात आले असून, आता तहसील कार्यालयाकडून टँकर सुरू केले जात आहेत़ त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना काही अंशी दिलासा मिळाला आहे़ पावसाने आणखी ओढ दिल्यास अनेक गावे व वाड्या- वस्त्यांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे़ (प्रतिनिधी)कुठे किती टँकरसंगमनेर- ४६,अकोले- १३, कोपरगाव- ९, राहुरी-१, नेवासा- ४, राहाता-१०, नगर-४१,पारनेर-४४, पाथर्डी- ७९, शेवगाव-२५, कर्जत-४०, जामखेड-१९, श्रीगोंदा-६