शहरं
Join us  
Trending Stories
1
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
2
“CM, DCM यांची दिल्लीत वट, अतिवृष्टीच्या नुकसानभरपाईचा प्रस्ताव केंद्राला पाठवा”: वडेट्टीवार
3
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
4
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...
5
सरकारी नोकऱ्यांसाठी वयोमर्यादा शिथील करावी, काश्मिरी हिंदूंची मागणी; काय म्हणालं सर्वोच्च न्यायालय?
6
कंपनीचं एक स्पष्टीकरण आणि ₹३,४०० नं वाढली शेअरची किंमत; रचला इतिहास, भाव विक्रमी उच्चांकावर
7
'तो' वाद जीवावर बेतला! अवघ्या २० रुपयांसाठी काँग्रेस नेत्याच्या भावाची गोळ्या झाडून हत्या
8
Solapur: 'भैय्याला आधी काढा.. तो आत अडकला आहे'; भावाचा मृत्यू, बहिणीचा आक्रोश; मृतदेहच सापडला
9
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
10
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
11
रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत प्रश्न विचारताच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री संतापले, म्हणाले पंतप्रधानांच्यां निवासस्थानाबाहेरही...  
12
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत फक्त व्याजातूनच ४.५ लाखांची कमाई; सोबत टॅक्समध्येही मिळतेय सूट
13
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
14
Food: भरपूर गर असलेले सीताफळ कसे निवडावे? कच्चे फळ निवडल्यास काय असतो धोका?
15
सरकारी कर्मचारी आणि पेन्शधारकांना मोठी दिवाळी भेट! पगारात होणारी इतकी वाढ
16
'आपलं अफेअर विसरून जा'; फॉर्महाऊसवर नेऊन अत्याचार केल्याचा तरुणीची आरोप, पोलीस निरीक्षकावर गुन्हा
17
पुणे विमानतळावर पंढरपुरातील नेत्याच्या बॅगेत बंदुकीसह सापडली काडतुसे; तो नेता कोण?
18
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
19
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
20
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले

चुकीने वगळलेली नावे समाविष्ट करा

By admin | Updated: June 20, 2014 00:38 IST

अहमदनगर : भारतीय निवडणूक आयोगाचे सचिव अनुज जयपुरीया यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील मतदार जनजागृती कामाचा आढावा घेतला.

अहमदनगर : भारतीय निवडणूक आयोगाचे सचिव अनुज जयपुरीया यांनी गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्ह्यातील मतदार जनजागृती कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी चुकीने ज्या मतदारांची नावे वगळली गेली असतील ते नव्याने समाविष्ट करण्याचे आदेश दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला जिल्हाधिकारी अनिल कवडे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सुनिल माळी आणि जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यावेळी उपस्थित होते. केंद्रिय सविच जयपुरीया म्हणाले की, जिल्ह्यात जानेवारी २०१४ या अहर्ता दिनांकावर आधारीत छायाचित्रांसह मतदार याद्यांचे विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. हा कार्यक्रम ३० जून पर्यंत सुरू राहणार असून त्या अनुशंगाने मतदार जागृती कार्यक्रम राबवणे आवश्यक आहे.ज्या मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आलेली आहेत. ती नावे पुन्हा यादीत घेणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक असणारा फॉर्म क्रमांक सहा सर्व तहसील कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आलेला आहेत. ज्या मतदारांचा मृत्यू झाला असेल, त्यांची डबल नावे मतदार यादीत असतील त्यांची नावे वगळण्यासाठी विशेष मोहिम राबविणे आवश्यक आहे. प्रत्येक गावात ज्या ठिकाणी जास्तीत जास्त लोक एकत्र येत असतील. उदाहरणार्थ दूध डेअरी, स्वस्त धान्य दुकाने, बँका, बचत गट, सहकारी संस्था, पतसंस्था, महाविद्यालय, विवाह नोंदणी कार्यालय त्या ठिकाणी हा सहा नंबर फॉर्म उपलब्ध करून देण्याची सूचना त्यांनी दिली. जिल्ह्यात सध्या पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. यात नावे समाविष्ट करण्याची २ हजार ३५८ प्रकरणे, नावे वगळण्याची १२३ प्रकरणे, दुरूस्तीची १७३ प्रकरणे आणि ठिकाण बदलीचे ४३ प्रकरणे असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली. देशात महाराष्ट्र राज्याला वेगळे महत्व असून राज्या नव मतदार नोंदणीचे काम जोमाने सुरू असल्याचे सचिव जयपुरीया यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)