अहमदनगर : प्रत्येक माणसाला जशी पोटाची भूक असते तशीच बुद्धीचीही भूक असते. बीज नेशनच्या माध्यमातून ती भूक आता शमली जाणार आहे. आपली माणस कशातच कमी नाहीत, पण एकमेकांचे पाय ओढण्यात त्यांना रस आहे. ही वृत्ती आता सोडून द्यावी लागेल. जेवढे तुम्हाला दुसऱ्याला देता येईल तेवढे द्या आणि पुस्तक वाचणाऱ्यांकडून त्यांचा अभिप्राय घ्या. व्यंकटेश फाउंडेशनच्या ‘बीज नेशन’मधून नवीन उद्योजक बनतील, असा आशावाद एस. जी. कायगावकर ज्वेलर्सचे संचालक सागर कायगावकर यांनी व्यक्त केला.
व्यंकटेश फाउंडेशन संचलित उद्योग क्रांती चळवळीच्या माध्यमातून बिजनेस बुक्स लायब्ररीचे उद्घाटन एस. जी. कायगावकर ज्वेलर्सचे संचालक सागर कायगावकर यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गजराज उद्योग समूहाचे संस्थापक सुरेश चव्हाण, नागेबाबा उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष कडूभाऊ काळे, व्यंकटेश ग्रुपचे अध्यक्ष अभिनाथ शिंदे आदी उपस्थित होते. (वा.प्र.)