शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पाथर्डीत मराठा आरक्षणासाठी बेमुदत ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 13:22 IST

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पाथर्डी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातून मोर्चा काढून शहर बंद ठेवण्यात आले.

पाथर्डी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी पाथर्डी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने शहरातून मोर्चा काढून शहर बंद ठेवण्यात आले. काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहून आंदोलनाला सुरवात करण्यात आली.कसबा उपनगरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मराठा क्रांती मोचार्ला सुरवात करण्यात आली. मोर्चात तालुक्यातून आलेल्या हजारो युवकांनी हातात भगवे झेंडे घेवून मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने फडणवीस सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या. मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शहरातील मुख्य पेठातून मोर्चा वसंतराव नाईक चौकातील वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यासमोर आल्यानंतर मोचार्चे रूपांतरण सभेत झाले. याठिकाणी मयत काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहून प्रमुख कार्यकर्त्यासह मुस्लीम, मागासवर्गीय समाजातील नागरिकांनी मराठा आरक्षणाला पाठींबा देण्यासाठी विचार व्यक्त केले.यावेळी मोर्चेकरयाना शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन करण्यात आले. यापुढील कालावधीत साखळी पद्धतीने वसंतराव नाइक चौकात आरक्षण मिळेपर्यंत ठिय्या आंदोलन सुरु राहणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील शाळा महाविद्यालयास सुट्टी देण्यात आली आहे. तर शहर बससेवा बंद ठेवण्यात आली आहे. मुख्य महामार्गावर आंदोलन सुरु असल्याने वाहतुकीस अडथळा येऊ नये म्हणून शेवगाव रोडने वाहतूक वळवण्यात आली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी