शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

चार दिवसांत एसटीचे दीड कोटीचे उत्पन्न बुडाले

By चंद्रकांत शेळके | Updated: November 2, 2023 21:46 IST

Ahmednagar: मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांकडून तोडफोड होण्याच्या शक्यतेने गेल्या चार दिवसांपासून एसटी सेवा बंद आहे. या चार दिवसात ५ लाख १७ हजार किलोमीटर फेऱ्या रद्द झाल्या असून एसटीचे सुमारे दीड कोटीचे उत्पन्न बुडाले आहे.

- चंद्रकांत शेळके अहमदनगर - मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांकडून तोडफोड होण्याच्या शक्यतेने गेल्या चार दिवसांपासून एसटी सेवा बंद आहे. या चार दिवसात ५ लाख १७ हजार किलोमीटर फेऱ्या रद्द झाल्या असून एसटीचे सुमारे दीड कोटीचे उत्पन्न बुडाले आहे. आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची सोय व एसटीच्या उत्पन्नाचा कालावधी लक्षात घेता लवकरात लवकर बससेवा सुरळीत व्हावी, अशी अपेक्षा एसटी महामंडळाकडून व्यक्त होत आहे.

मराठा आंदोलनामुळे प्रारंभी मराठवाड्यातील एसटी सेवा विस्कळीत झाली. बीड जिल्ह्यात काही बसची तोडफोड झाल्याने अहमदनगर विभागीय कार्यालयाने सोमवारी (दि. ३०) बीडकडे जाणारी वाहतूक बंद केली. त्याच दिवशी इतर काही आगारांच्या फेऱ्याही कमी करण्यात आल्या. परिणामी पहिल्या दिवशी ६४ हजार किलोमीटर फेऱ्या रद्द झाल्याने १८ लाखांचे उत्पन्न बुडाले.

दरम्यान, मंगळवारपासून तुरळक फेऱ्या वगळता सर्वच फेऱ्या रद्द झाल्याने १ लाख २६ हजार किलोमीटरच्या फेऱ्या बंद राहिल्या. त्यामुळे मंगळवारी ३२ लाख ५० हजारांचे नुकसान झाले. बुधवारीही आंदोलनावर तोडगा निघाला नाही. त्यामुळे महामंडळाने एसटी बससेवा बंदच ठेवली. परिणामी बुधवारी १ लाख ७९ हजार किलोमीटर फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. त्यात ४६ लाखांचे नुकसान झाले. त्यानंतर गुरूवारी सायंकाळपर्यंत फेऱ्या बंदच होत्या. त्यात दीड लाख किलोमीटरच्या ४० लाखांचे नुकसान झाले. असे एकूण चार दिवसांत ५ लाख १७ हजार किलोमीटर फेऱ्या रद्द होऊन सुमारे दीड कोटीचे नुकसान झाले.

दरम्यान, चारही दिवस खासगी प्रवाशी वाहतूक सुरू होती. यात अनेक प्रवाशांची आर्थिक लूट झाल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून झाल्या.

टॅग्स :state transportएसटीAhmednagarअहमदनगर