शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

तुरुंगात टाकण्याची दिली धमकी, पीआयसह दोन कर्मचाऱ्यांवर गुन्हा

By शिवाजी पवार | Updated: December 19, 2023 17:13 IST

श्रीरामपुरातील घटना : पोलिस ठाण्यात तरुणांना मारहाण प्रकरण.

श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : खोटा गुन्हा दाखल करून तुरुंगात टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशावरून पोलिस निरीक्षकासह दोघा पोलिस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यासाठी ११२ क्रमांकावर फोन केल्यानंतर पोलिसांनी फिर्यादीला अशी वागणूक दिली होती. याप्रकरणी सूरज राजकुमार यादव (वय २१, वार्ड क्रमांक सहा) याने फिर्याद दाखल केली होती. यावरून तत्कालीन तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात, पोलिस कर्मचारी चांद पठाण व हबीब शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. हा गुन्हा आता सोमवारी श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

तालुक्यातील कारेगाव येथे २२ फेब्रुवारी २०२३ मध्ये मित्र ओंकार उर्फ भोला साळवे याने अल्पवयीन मुलीचा विवाह पार पडत असल्याची माहिती दिली. त्यावरून ११२ क्रमांकावर फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर तालुका पोलिस ठाण्याचे कर्मचारी घरी आले. चांद पठाण याने शिवीगाळ सुरू केली. बळजबरीने गाडीत बसवून पोलिस ठाण्यात नेले. मित्र साळवे यालाही तेथे आणण्यात आले. पोलिसांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. मोबाइल हिसकावून घेतले. पोलिसांना खोटी माहिती पुरविली. मुलगी अल्पवयीन नसून यात पडू नये, असे धमकावले. पोलिसांनी कुटुंबीयांनाही वाईट वागणूक दिली, असे यादव याचे म्हणणे आहे.

जखमी यादव हा शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी गेला असता डॉक्टरांनी कारण विचारले. त्यावर त्याने घडलेला प्रकार सांगितला. तेथे जबाब घेण्यासाठी शहर पोलिस ठाण्यातील हबीब शेख दाखल झाले. त्यांनीही या प्रकरणात न पडण्याचे सांगत दबाव आणला. अखेर आपण गृहमंत्री, मुख्यमंत्री यांना घडलेल्या अन्यायाची माहिती पत्राद्वारे कळविली. त्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालयात जबाब नोंदवून घेण्यात आला. पोलिस ठाण्यातील मारहाणीचे चित्रण माहिती अधिकारात मागितले असता ते उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे यादव याने न्यायालयात धाव घेतली होती.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरCrime Newsगुन्हेगारी