अहमदनगर : रमजान महिन्याचे अखेरचे पर्व सुरु असून, मुस्लीम बांधवांना आता ईदचे वेध लागले आहेत़ ईदच्या दिवशी मुस्लीम बांधव शिरखुर्मा करुन हिंदू बांधवांना निमंत्रित करतात़ शिरखुर्मा तयार करण्यासाठी व उपवास सोडण्यासाठी मुस्लीम बांधवांकडून मोठ्या प्रमाणात सुकामेवा, बेदाणे खरेदी केले जातात़ यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याचे व्यापारी सांगतात़रमजान महिन्यातील तिसरा अशरा सुरु असून, २६ रोजे पूर्ण झाले आहेत़ तिसरा अशरा महत्वपूर्ण मानला जातो़ यामध्ये मोक्ष प्राप्ती मिळते, अशी भावना आहे़ रमजान ईदच्या दिवशी महिनाभरातील उपवास सुटतात़ उपवास सोडण्यासाठी घरोघर शिरखुर्मा बनविला जातो़ शिरखुर्म्यासाठी लागणाऱ्या शेवया, खोबरे, बदाम, पिस्ता, चारोळे, अक्रोड, दूध, काजू, जर्दाळू आदी पदार्थांची खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात बाजारात गर्दी होत आहे़ शिरखुर्म्यासोबत गुलगुलेही केले जातात़ या खाद्य पदार्थांना सध्या मोठा उठाव असल्यामुळे दरही वाढले आहेत़ सध्या इराण, अरब, मबरुक आदी राष्ट्रातून मोठ्या प्रमाणात आवक होत आहे़ रमजान ईदसाठी होणाऱ्या खाद्यान्न खरेदीतून २० ते २५ कोटी रुपयांची उलाढाल होत असल्याचे व्यापारी सांगतात़रमजान महिन्यात खजूरला सर्वाधिक मागणी असते़ खजूरचे वेगवेगळे प्रकारही लोकप्रिय होत असून, अरब देशातून मोठ्या प्रमाणात खजूर आयात होते़ इराणी खजूर, मबरुक खजूर, अरबी खजूर, ओमान खजूर, मसकती खजूर या प्रकारातील खजूरला मोठी मागणी आहे़ या खजूरचे भाव १०० रुपयांपासून ते ४०० रुपये किलोप्रमाणे आहेत़ (प्रतिनिधी)असा आहे दरअरबी खजूर ४०० रुपये किलोमबरुक खजूर २५० रुपये किलोइराणी खजूर १०० रुपये किलोकाजू ५०० ते १२०० रुपये किलोबदाम ६०० ते ७००पिस्ता १५०० ते १९००चारोळी ९०० ते १०००खोबरे कीस १८०हिरवी वेलची १५००आक्रोड १२००सुकी खारीक २००
सुकामेव्याची परराष्ट्रातून आयात
By admin | Updated: July 27, 2014 01:08 IST