शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

तत्काळ कर्जमाफी द्या

By admin | Updated: May 6, 2016 23:28 IST

जामखेड : राज्यात भीषण दुष्काळस्थिती असल्यामुळे आम्ही दोन विधानसभा अधिवेशन काळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली, परंतु याकडे दुर्लक्ष झाले.

जामखेड : राज्यात भीषण दुष्काळस्थिती असल्यामुळे आम्ही दोन विधानसभा अधिवेशन काळात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी केली, परंतु याकडे दुर्लक्ष झाले. आता उच्च न्यायालयाने शेतकऱ्यांच्या पीक कर्जमाफीचा विचार करा म्हणून सूचना केली आहे. याचा विचार करून शासनाने तत्काळ कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. जामखेड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या भुतवडा तलावातील गाळ काढण्याच्या कामाची अजित पवार यांनी शुक्रवारी पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. पवार यांच्यासमवेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री सुरेश धस, जामखेडच्या नगराध्यक्षा प्रीती राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय वारे, तालुकाध्यक्ष राजेंद्र कोठारी, युवक अध्यक्ष मयुर डोके, प्रदीप पाटील, बापूराव ढवळे, संदीप गायकवाड, राजू गोरे हजर होते. अजित पवार म्हणाले, निम्मा महाराष्ट्र दुष्काळी आहे. टंचाईस्थिती भीषण असल्याने केंद्र व राज्य सरकारने उपाययोजना करावी. सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून दुष्काळाला सामोरे जावे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २००८ साली सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना ७२ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली. त्यामुळे आता कर्जमाफी करावी. आताची दुष्काळस्थिती पाहून शरद पवार यांनी पक्षाची बैठक घेऊन दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदतीचे आवाहन केले. त्यानुसार पक्षाने मराठवाड्यात नदीचे खोलीकरण, रुंदीकरण व गाळ काढण्याची मोहीम हाती घेतली. २०१२ साली भुतवडा तलावातील गाळ काढण्याच्या शुभारंभासाठी आलो होतो. तलावातील गाळ निघून पाणीसाठा वाढावा, हा यामागे हेतू होता. त्यासाठी निधी देण्याचा प्रयत्न केला. परंतु दोन ते तीन दिवसांच्या कालावधीनंतर पाऊस झाल्याने गाळ काढण्याचे बारगळले. सध्या लोकसहभागातून गाळ काढण्याचे काम चालू आहे. यासाठी ४२ लाखाचा निधी जमा झाला आहे, परंतु तलावातील गाळ पाहता निधी कमी आहे. यासाठी शासनाने मदत द्यावी. तसेच उद्योजक व मोठ्या कंपन्या दुष्काळ निवारणासाठी निधी देणार आहेत. त्यातील निधी देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे अजित पवार म्हणाले. भुतवडा जोडतलावाचे काम पूर्ण झाल्यास ४८ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होऊन पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी उपयोगात येईल. या कामासाठी टेंडर निघाले, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे लवकर रिटेंडर करून कामास सुरुवात करावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मयुर डोके यांनी अजित पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली. रिटेंडरचा निर्णय घेण्यास भाग पाडू, असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. यावेळी अनेकांनी अजित पवार यांना विविध मागण्याचे निवेदन दिले.