गोवंश हत्या करणारे आरोपी व त्यांच्या वाहनांवर गुन्हे दाखल असूनही पुढेही दरवेळी तीच वाहने त्याच गुन्ह्यात वापरली जातात व आरोपी पुन्हा गुन्हे करतात. संगमनेर शहरातील जमजम कॉलनी, भारत नगर, रेहमत नगर, कोल्हेवाडी रोड, फादरवाडी, कुरणरोड, मोगलपुरा या ठिकाणी गोवंश जनावरांची कत्तल करून तेथे गोमांसाची विक्रीही होते. त्या ठिकाणी बेकायदेशीर पत्र्याच्या शेड (वाडे) बनवलेले आहे. या ठिकाणी एका वेळेस २०० ते ३०० गोवंश ठेवता येईल अशी जागा आहे. या ठिकाणी संगमनेर नगरपरिषदेने अनधिकृत नळ जोडणी दिली आहे. तसेच कत्त्तलीसाठी अत्याधुनिक कटिंग मशिनसाठी बेकायदेशीर विज जोडणी केली आहे. नदीपात्रालगत असलेल्या गावांमध्ये दुर्गंधी, दूषित पाणी यामुळे ग्रामस्थांना आजार होत आहेत. संगमनेर येथून गोमांस मुंबई, भिवंडी, संभाजीनगर, गुलबर्गा, हैदराबाद या ठिकाणी पाठवले जाते. माहिती देऊन, चारचाकी वाहनांचे क्रमांक देवूनही कारवाई होत नाही, असे निवेदनात म्हटले आहे. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर संगमनेरात सशस्त्र जीवघेणा हल्ला झाला. त्यात तिघेजण गंभीर जखमी झाले. दिवाळीपासून राहाता तालुक्यातील ममदापूर व नेवासा तालुक्यातील सबलतपुर येथे गोवंशाची मोठ्या प्रमाणावर हत्या होऊन तेथून गोमांस वाहतूक सुरू आहे. संगमनेर, राहता, श्रीरामपूर, नेवासा, कोपरगाव, अकोले येथील बेकायदेशीर कत्तलखाने कायमस्वरूपी बंद करण्यासाठी कारवाई करावी, असेही निवेदनात म्हटले आहे.
बेकायदा सुरू असलेले कत्तलखाने बंद करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:35 IST