शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काळकूपमध्ये दुस-या दिवशीही अवैध वाळूउपसा : माहिती देऊनही महसूलचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2017 18:19 IST

काळकूप (ता. पारनेर) येथील नदीवर अवैध वाळूउपसा होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून होत आहेत. येथे शनिवारपासून वाळूउपसा होत असून, लोकमतनेही सोमवारच्या अंकात याबाबत वृत्त प्रसिद्ध करून तहसीलदारांना चोरट्या वाळूवाहतुकीची कल्पना दिली. मात्र दुसºया दिवशीही यासंदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही.

अहमदनगर : काळकूप (ता. पारनेर) येथील नदीवर अवैध वाळूउपसा होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून होत आहेत. येथे शनिवारपासून वाळूउपसा होत असून, लोकमतनेही सोमवारच्या अंकात याबाबत वृत्त प्रसिद्ध करून तहसीलदारांना चोरट्या वाळूवाहतुकीची कल्पना दिली. मात्र दुसºया दिवशीही यासंदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही.काळकूप येथे गावालगत कापरी नदी असून, ही पुढे भाळवणीला जाते. या नदीत शनिवारपासून जेसीबी व ट्रॅॅक्टर लावून वाळूउपसा होत असल्याची माहिती काही जणांनी माध्यमांना दूरध्वनी करून कळवली. त्यावर ‘लोकमत’ने पारनेरच्या तहसीलदार भारती सागरे यांना दूरध्वनीवर या प्रकाराची माहिती दिली. सागरे यांनी वाळूउपसा होत असेल, तर त्वरित कारवाई करू, असे सांगितले. मात्र त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले नाही.सोमवारपर्यंत हा उपसा सुरू होता. सोमवारी पुन्हा तहसीलदार सागरे यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी फोन उचलला नाही. माध्यमांनी माहिती देऊनही कारवाई होत नसेल, तर सामान्य नागरिकांच्या तक्रारीची दखल महसूल विभागाकडून कशी आणि केव्हा घेतली जात असेल, याची कल्पना येते. जिल्ह्यात सध्या महसूलतर्फे कोणताही अधिकृत वाळूठेका दिलेला नाही. कोणत्याही वाळूसाठ्याचा लिलाव झालेला नसताना अवैध वाळूउपसा मात्र जोरात सुरू आहे. महसूल विभाग मात्र याबाबत गप्प आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरParnerपारनेर