शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

अवैध वाळू वाहतूक : नेवासा येथे दोन टेम्पोसह सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 20:10 IST

तालुक्यातील भालगाव येथील गोदावरी नदी पत्रात व मडकी येथील प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी दोन टेम्पो नेवासा पोलिसांनी पकडला.

नेवासा : तालुक्यातील भालगाव येथील गोदावरी नदी पत्रात व मडकी येथील प्रवरा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक केल्याप्रकरणी दोन टेम्पो नेवासा पोलिसांनी पकडला. यामध्ये दोन ब्रास वाळुसह सात लाख पंधरा हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  बुधवारी रात्री १० च्या सुमारास देवगड ते नेवासा रस्त्यावर मडकी शिवारात प्रवरा नदीपात्रातुन अवैधरित्या वाळूची वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांना समजली. यावेळी त्यांच्या पथकातील कैलास साळवे, वसीम इनामदार, प्रीतम मोढवे, महेश कचे यांना कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने सापळा रचला. त्यावेळी टेम्पो (क्र.एम.एच.२१ -५५४८) पकडला. त्यात अंदाजे एक ब्रास वाळू होती. यामध्ये तीन लाख सात हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संजय नळघे याला ताब्यात घेण्यात आले आहे. तर गुरुवारी सकाळी भालगाव येथील गोदावरी नदीपात्रात वाळू वाहतुकीची माहिती पोलीस पथकातील बबन तमनर, महेश कचे, गणेश गलधर, केवळ राजपूत यांनी सापळा रचून टेम्पो (क्र. एम.एच.०४, डी.के.८३२४)पकडला. यामध्ये चालक गणेश शिरसाठ ला ताब्यात घेण्यात आले असून चार लाख सात हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल संदीप मस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा