शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीन झोन’ पट्ट्यातच बेकायदेशीर बांधकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2020 16:47 IST

‘लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : सीना नदी लगतच्या शेतजमिनीत खुलेआम अवैध प्लॉट पाडून विक्री सुरू आहे. ग्रीन झोनमध्येच अतिक्रमण करून टोलेजंग इमारती बांधल्या आहेत. सावेडीत पंपिंग स्टेशन रोड ते सत्यम हॉटेल रस्त्यावर सीना नदीच्या बाजूला पूररेषेत मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरु आहेत. यात एका नेत्याच्या हेल्थक्लबचे कामही सुरु आहे. ही कामे नियमानुसार आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

‘लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : सीना नदी लगतच्या शेतजमिनीत खुलेआम अवैध प्लॉट पाडून विक्री सुरू आहे. ग्रीन झोनमध्येच अतिक्रमण करून टोलेजंग इमारती बांधल्या आहेत. सावेडीत पंपिंग स्टेशन रोड ते सत्यम हॉटेल रस्त्यावर सीना नदीच्या बाजूला पूररेषेत मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरु आहेत. यात एका नेत्याच्या हेल्थक्लबचे कामही सुरु आहे. ही कामे नियमानुसार आहेत का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. महापालिकेने वाडियापार्क येथील अनधिकृत बांधकाम भुईसपाट केले. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत प्रशासनाने पाठ थोपटून घेतली. मात्र शहरातील ओढे व नाल्यातील बांधकामाबाबत महापालिका मूग गिळून गप्प असल्याचे दिसते.सीना नदीलगत नागापूर, बोल्हेगाव, बोरुडेमळा, नालेगाव, काटवन खंडोबा परिसर, अमरधाम, पुणे रोड, बुरुडगाव आणि अन्य भागातील ग्रीन झोनमध्ये           प्लॉटींग करून बांधकामे सुरू आहेत. सत्यम हॉटेल ते पंपींग स्टेशन रस्त्यालगत ग्रीन झोनमध्ये मंगल कार्यालये, हेल्थ क्लब, हॉटेल्सची कामे सुरू आहेत. महापालिका प्रशासनाची यास परवानगी आहे का? असा प्रश्न केला जात आहे.  इमारत बांधून झाल्यानंतर कुणी तक्रार केली तरच कारवाई होते. तक्रारीची दखल घेऊन महापालिका संबंधितांना नोटीस बजावते. त्याविरोधात संबंधित व्यक्ती न्यायालयात धाव घेतात. त्यानंतर सदर प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याचे सांगून महापालिकेचे अधिकारीही वेळ मारून नेतात, अशी कार्यपद्धती महापालिकेत विकसित झाली आहे. महापालिकेच्या आयुक्त पदाचा पदभार जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी यांच्याकडे आहे. गतवर्षीही त्यांच्याकडे आयुक्त पदाचा पदभार असताना त्यांनी सीना स्वच्छतेची मोहीम राबविली. आयुक्त आता या पूररेषा भागाचा फेरफटका करणार का? याबाबत उत्सुकता आहे. विशेष म्हणजे या भागातील नगरसेवकही अनधिकृत बांधकामांकडे कानाडोळा करतात. काही नगरसेवकांनीच अशी बांधकामे केल्याची चर्चा आहे. नगरसेवकांनी अतिक्रमण केले तर त्यांचे पद रद्द करण्याची तरतूद आहे. महापालिकेने सीना नदी काढाचे सर्वेक्षण केल्यास किती लोकप्रतिनिधींनी अतिक्रमणे केली ते समोर येणार आहे. या बांधकामांवर हातोडा पडणार का? याची नागरिकांना प्रतीक्षा आहे.