शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

कोबंड्यांच्या घरांकडे लक्ष पुरवाल, तर अधिक फायदा मिळवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2023 18:27 IST

हवामानातील बदल, ऊन, वारा, पाऊस, थंडी तसेच इतर प्राण्‍यांपासून संरक्षणासाठी कोंबडयांना घराची आवश्‍यकता असते. प्रत्‍येक अंडी देणा-या कोंबडीस अडीच ते तीन चौरस फुट जागा लागते.

कुक्‍कुटपालन हा व्‍यवसाय अंडयांसाठी व मांसासाठी करतात. अंडयासाठी ठेवण्‍यात येणा-या कोंबडयांपासून दररोज उत्‍पन्‍न मिळते. अंडयांसाठी व्‍हाईट लेग हॉर्न नावाची जात प्रसिध्‍द आहे. या जातीच्‍या कोंबडया केंद्रीय कुक्‍कट पैदास केंद्र, मुंबई, पुणे किंवा व्‍यंकटेश्‍वर हॅचरी, पुणे येथून मिळू शकतात. मांसासाठी कोंबडया दोन महिने ठेवल्‍या जातात. या संकरित कोंबडया असुन त्‍यांना ब्रॉयलर्स असे म्‍हणतात. या कोंबडया व्‍यंकटेश्‍वर हॅचरी, पुणे, पूना पर्ल्‍स, पुणे इत्‍यादी ठिकाणाहून उपलब्‍ध होऊ शकतात.

कोंबडयांची घरे :हवामानातील बदल, ऊन, वारा, पाऊस, थंडी तसेच इतर प्राण्‍यांपासून संरक्षणासाठी कोंबडयांना घराची आवश्‍यकता असते. प्रत्‍येक अंडी देणा-या कोंबडीस अडीच ते तीन चौरस फुट जागा लागते. घराची लांबी, पक्ष्‍यांची लांबी व पक्ष्‍यांच्‍या संख्‍येवर अवलंबून असावी. मात्र रुंदी 25 फुटापेक्षा जास्‍त असू नये. घरांची लांबी पूर्व-पश्चिम असावी. ही घरे जमिनीपासून 2 ते 2.5 फुट उंचीवर असावीत. जोत्‍यापासून 2.5 – 3 फुट भिंती घ्‍याव्‍यात व त्‍यावर छतापर्यत बारीक जाळया बसवाव्‍यात. छताची मधील उंची 12 – 15 फुट असून ते दोन्‍ही बाजूस उतरते असावे.

पक्षी पालनाच्‍या पध्‍दती :सर्वत्र प्रचलित असलेल्‍या कोंबडया पाळण्‍याच्‍या दोन पध्‍दती आहेत. त्‍या म्‍हणजे गादी पध्‍दत (डीप लिटर) व पिंजरा पध्‍दत.

गादी पध्‍दत :या पध्‍दतीत कोंबडया जमिनीवर लिटर पसरुन त्‍यावर वाढविल्‍या जातात. लिटरसाठी (गादीसाठी) लाकडाचा भुसा, शेंगाचे फोलपट, भाताचे तूस उपयोगात आणतात. यामध्‍ये कोंबडयाची विष्‍ठा यावर पडते व ती शोषली जाते. गादी माध्‍यमे दररोज हलवली जातात व त्‍यात चुना मिसळावा. त्‍यामुळे ही कोरडी राहण्‍यास मदत होते व शेवटी याचा उपयोग खत म्‍हणून होतो.

पिंजरा पध्‍दत :या पध्‍दतीत एक कोंबडी एका पिंज-यात किंवा दोन – तीन कोंबडया एका पिंज-यात ठेवल्‍या जातात. सर्वांसाठी लांब एकच एक पन्‍हाळयासारखे खाद्याचे व पाण्‍याचे भांडे जोडलेले असत. यात प्रति पक्षास 60 – 70 चौरस इंच किंवा एक चौरस फुट जागा दिली जाते. विष्‍ठा परस्‍पर पिंज-याच्‍या खाली केलेल्‍या खड्डयात जमा होते. प्रत्‍येक पिंज-याची पुढील उंची 18 इंच व मागील उंची 15 इंच असते. त्‍यामुळे मागील बाजूस उतार मिळून व अंडी गोळा होण्‍यास मदत होते.

पिल्‍लांची जोपासना :एक दिवसाची पिल्‍ले ठेवण्‍यापुर्वी घरे स्‍वच्‍छ धुवून निर्जंतुक करावीत, जमिनीवर लिटर पसरुन ठेवावे. ब्रूडरची (कृत्रिम दायी) ची व्‍यवस्‍था करवी व त्‍यातील तापमान नियंत्रित करावे. पिल्‍लांना सुरुवातीस चार आठवडयांपर्यंत कृत्रिम उष्‍णतेची गरज असते. यासाठी सुरुवातीचे तापमान 15 अंश फॅ. असावे व त्‍यानंतर प्रत्‍येक आठवडयास ते 5 अंश ने कमी करावे.

बांबूची टोपली किंवा लाकडाचे खोके ब्रुडरसाठी उपयोगात आणता येतात. दोनशे पन्‍नास पिल्‍लांसाठी 4 फुट व्‍यासाचे 1.5 ते 2 फुट उंचीचे ब्रुडर पुरेसे आहे. प्रत्‍येक पिल्‍लास 7 – 10 चौरस इंच जागा लागते. पिल्‍ले आल्‍यावर त्‍यांना पाण्‍यातून ग्‍लूकोज द्यावे. सुरुवातीचे तीन दिवस खाद्य जाड कागदावरच द्यावे.

टॅग्स :farmingशेतीFarmerशेतकरी