अहमदनगर : पांगरमल येथील दारुकांडात आठ जणांचा बळी गेला असून आरोपींना तत्काळ अटक करावी व पीडित कुटुंबीयांना व उपचार घेत असलेल्या रुग्णांना आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागणीची दखल न घेतल्यास बळी गेलेल्यांचा दशक्रिया विधी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात येईल, असा इशारा पांगरमल ग्रामस्थांनी दिला़ पांगरमल येथे विषारी दारूमुळे २५ ते ३० जणांना बाधा होऊन आठ जणांचा मृत्यू झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी पांढरीपूल येथे सोमवारी रास्ता रोको आंदोलन केले़ आरोपींना अटक करण्यावरुन पोलिसांवर राजकीय दबाव आहे. प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा. हा खटला चालविण्यासाठी विशेष सरकारी वकील अॅड़ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी आदी मागण्या ग्रामस्थांनी केल्या़पोलीस उपाधीक्षक आनंद भोईटे यांनी निवेदन स्वीकारून आरोपींवर कारवाई करण्याचे तसेच निकम यांच्या नियुक्तीबाबत प्रस्ताव पाठविण्यात येईल, असे आश्वासन दिले़
तर दारुकांडातील बळींचा होणार दशक्रिया विधी
By admin | Updated: February 21, 2017 04:01 IST