शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सावरकरांना भारतरत्न दिला तर क्रांतीकारकांच्या बलिदानाचा अपमान ठरेल-कन्हैयाकुमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 13:00 IST

अहमदनगर : इंग्रजांकडे माफी मागणा-या सावरकरांना भारतरत्न दिला तर देशासाठी बलिदान देणा-या भगतसिंग यांच्यासह इतर क्रांतीकारकांचा तो अपमान ठरेल़. भाजपाने सावरकरांना भारतरत्न देण्याचा संकल्प केला आहे़. त्यानंतर मात्र हा पुरस्कार कोणत्याच देशभक्ताला देऊ नये, असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कौन्सिल सदस्य व विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार यांनी गुरुवारी नगर येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले़. 

अहमदनगर : इंग्रजांकडे माफी मागणा-या सावरकरांना भारतरत्न दिला तर देशासाठी बलिदान देणा-या भगतसिंग यांच्यासह इतर क्रांतीकारकांचा तो अपमान ठरेल़. भाजपाने सावरकरांना भारतरत्न देण्याचा संकल्प केला आहे़. त्यानंतर मात्र हा पुरस्कार कोणत्याच देशभक्ताला देऊ नये, असे मत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कौन्सिल सदस्य व विद्यार्थी नेते कन्हैयाकुमार यांनी गुरुवारी नगर येथे माध्यमांशी बोलताना व्यक्त केले़. कन्हैयाकुमार म्हणाले, महात्मा गांधीजींच्या हत्येमध्ये ज्या सावरकांराचा सहभाग होता, त्यांना भारतरत्न देण्याचा संकल्प करणारे भाजपा सरकार हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहे़. या सरकारच्या विरोधात बोलणारे पत्रकार, कलाकार, विद्यार्थी यांना दोषी ठरवून त्यांचा आवाज दाबला जात आहे़. सत्ताधारी पैसा कमवित आहेत. तर काही नेते पक्षांतर करून स्वत:कडील पैसा वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत़. सरकारी संस्थांचा गैरवापर करून ईडीची भीती दाखविली जात आहे़. राष्ट्रीय स्तरावरील प्रश्नांचा बाहू करून सध्या महाराष्ट्रातील जनतेमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे़. धार्मिक आणि इतर भावनिक प्रश्न उपस्थित करून मूळ प्रश्नांना बगल दिली जात आहे़. सत्ताधारी देशात सध्या इंग्रजांची नीती वापरून वाद घडवित आहेत़. देशासह महाराष्ट्रातील जनतेने आता विरोधी पक्ष काय करतोय यावर विचार न करता लोकशाही वाचविण्यासाठी आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी निवडणुकीत चांगल्या उमेदवारांना निवडून द्यावे़ जनतेच्या जनआंदोलनातूनच पर्याय तयार होणार आहेत़. गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेले किती आश्वासने पूर्ण केले हे त्यांना विचारण्याची गरज आहे़. पीएमसी बँक बुडाल्यानंतर अनेक गुंतवणूकदार आत्महत्या करीत आहेत़. सरकार मात्र काही करायला तयार नाही, अशी टीका कन्हैयाकुमार यांनी केली़.  

टॅग्स :PoliticsराजकारणMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019