शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

गडाख भाजपात असते तर ‘शनैश्वर’वर प्रशासक नसता - रामदास कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 11:09 IST

गडाख भाजपामध्ये असते तर श्री शनैश्वर देवस्थानवर प्रशासक नियुक्तीचा निर्णय झाला नसता.

भाळवणी : गडाख भाजपामध्ये असते तर श्री शनैश्वर देवस्थानवर प्रशासक नियुक्तीचा निर्णय झाला नसता. शासनाला भाजप कार्यकर्त्यांना संधी द्यायची असल्याने शासनाने देव, देवतांनाही राजकारणातून सोडले नाही, अशी टीका पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केली.पारनेर तालुक्यातील बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर व विधानसभा निवडणुकीची पूर्व तयारी म्हणून शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले यांच्या पुढाकाराने तालुक्यातील शिवसेना कार्यकर्त्यांचे गुरुवारी भाळवणी येथे प्रशिक्षण शिबिर झाले. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत, महिला आघाडीच्या नेत्या आमदार नीलम गोºहे, जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर, जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे, समन्वयक विश्वनाथ नेरूरकर, आमदार नरेंद्र दराडे, आमदार विजय औटी होते.पर्यावरण मंत्री कदम म्हणाले, फक्त तालुक्यापुरतेच शिबिराचे आयोजन न करता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अशी शिबिरे घेतली जावीत. पैशाच्या जोरावर धनदांडग्यांचे राजकारण जास्त टिकत नाही. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शन तत्वानुसार ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या कणखर नेतृत्वाखाली शिवसेना कार्यकर्ते करीत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी जनतेच्या भावनांशी खेळत आहेत, अशी टीकाही त्यांनी केले.खासदार राऊत म्हणाले, शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी ५२ वर्षापूर्वी शिवसेनेची स्थापना करुन मराठी बांधवांसाठी विशेष करुन मुंबईकर मराठी बांधवांसाठी त्यांच्या हक्काच्या निवाऱ्यासाठी व रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विशेष प्रयत्न केले.पारनेरचा प्रत्येक मुंबईकर शिवसेनेचा कार्यकर्ता आहे. नगर शहरात दोन शिवसेना कार्यकर्त्यांची भर दिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यातील खरे गुन्हेगार अजूनही मोकाटच आहेत. जे पकडले त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीकाही राऊत यांनी केली.विखे द्विधा मनस्थितीत- राऊतराज्याचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे कोणत्या पक्षात जावे या विचारात असून ते सध्या व्दिधा मन:स्थितीत आहेत. शिवसेनेची ताकद शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कणखर नेतृत्वातून दिसत असल्याने भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची शिवसेनेशी युतीसाठी मनधरणी सुरू आहे. सत्तेवर आल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व सुनील तटकरे यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणाºया शासनाला चार वर्षे पूर्ण होऊनही अद्यापही शासन गप्पच असल्याचे खा. राऊत म्हणाले.दुपारच्या चर्चासत्रात आमदार नीलम गोºहे, संपर्क प्रमुख भाऊ कोरेगावकर यांनी मार्गदर्शन केले. आमदार विजय औटी यांनी आभार मानलेशिबिरास जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते, बाबासाहेब तांबे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक कटारिया, सभापती गणेश शेळके, शिवसेना तालुकाप्रमुख विकास रोहोकले, भाळवणीच्या सरपंच लीलाबाई रोहोकले, ढवळपुरीचे सरपंच डॉ. राजेश भनगडे, गोरेगावच्या सरपंच सुमन तांबे, पाडळीचे सरपंच हरिष दावभट, भाळवणीचे उपसरपंच संदीप ठुबे, तालुक्यातील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांचीही उपस्थिती लक्षणीय होती.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRamdas Kadamरामदास कदम